Government Job Rules Saam Tv
लाईफस्टाईल

Government Job Rules : टॅटू असेल तर सरकारी नोकरीला मुकाल, नियम माहीत आहे का?

तुम्ही सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फारच महत्वाची आहे.

कोमल दामुद्रे

Government Job Rules : आजकाल तरुणाईमध्ये शरीरावर टॅटू काढण्याची क्रेज पाहायला मिळते. अनेक जण आपल्या नावाचे किंवा आवडत्या वस्तूचे चित्र टॅटू स्वरुपात शरीरावर काढत असतात. मात्र या एका टॅटूने देखील तुमच्या आयुष्यातील अनेक मोठ्या संधी जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फारच महत्वाची आहे.

सरकारी नोकरीमध्ये शरीरावर एकही टॅटू असल्याल सरळ बाहेरचा रस्ता धरावा लागतो. टॅटू असल्यास सरकारी नोकरी मिळवण्यात अनेक अडचणी येतात. पब्लिक सेक्टरमध्ये टॅटू बॅन करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांनी टॅटूपासून दूर राहिलेलेच बरे. (Why Tattoo Ban In Government Job)

टॅटूमुळे कोणकोणत्या नोक-या मिळणार नाहीत

1. भारतीय प्रशासकीय सेवा

भारतीय प्रशासकीय सेवा IASमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला हा नियम पाळावा लागेल. शरीरावर टॅटू असल्यास तुम्ही भारतीय प्रशासकीय सेवेत काम करु शकत नाही.

2. भारतीय पोलिस सेवा

भारतीय पोलिस सेवेत भरती होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यासाठी मोठी मेहनतही घेतली जाते. मात्र तुमच्या शरीरावर टॅटू असेल तर लेखी परीक्षा पास करुनही तुम्हाला त्यात संधी मिळू शकत नाही.

3. अंतर्गत महसूल सेवा

IRS म्हणजेच अंतर्गत महसूल सेवेत रुजू होताना तुमच्या शरीरावर टॅटू नसावा.

4. भारतीय परराष्ट्र सेवा

IFS मध्ये नोकरीसाठी देखील हा नियम लागू आहे. यात टॅटू असलेल्यांना नोकरी दिली जात नाही.

5. भारतीय सैन्य आणि नौदल

भारतीय (India) सैन्य व नौदलात केंद्र सरकारने काही बदल केले आहेत. यात सेवेचा कालावधी ५ वर्षांचा ठेवण्यात आला आहे. असे असले तरी सैन्य आणि नौदलातील भरतीसाठी शरीरावर टॅटू बंधनकारक आहे.

6. भारतीय तटरक्षक दल

भारतीय तटरक्षक दलाची भरती प्रक्रिया फार कठीण आहे. त्यामुळे इथे नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल तर शरीरावर कोणताही टॅटू काढू नका.

टॅटूच्या या नियमात तुमच्या शरीरावर बारीक टॅटूचा ठिपका जरी असेल तरी देखील तुम्हाला संधी दिली जात नाही.

सरकारी नोकरीत टॅटूला बंदी का ?

टॅटू काढल्याने त्या व्यक्तीला काही आजारांचा (Disease) सामना करावा लागेल अशी शक्यता असते. यात HIV, हेपेटाइटिस A, B आणि विविध चर्मरोग होण्याची शक्यता असते. तसेच शरीरावर टॅटू असल्यास असे समजले जाते की, ती व्यक्ती अस्थापनेतील नियमांचे पालन करण्यास असक्षम आहे. सुरक्षा दलात गोपनीयता महत्वाची असते. अशात त्या कर्मचा-याला पकडले तर टॅटूवरुण त्याची ओळख पटकन समजते. त्यामुळे टॅटू अनेक नोक-यांमध्ये बॅन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT