काही कुटुंबे मृत व्यक्तीचे कपडे आठवण म्हणून जपून ठेवतात.
काही ठिकाणी हे कपडे नातेवाईकांना किंवा गरजू व्यक्तींना दिले जातात.
काही धार्मिक परंपरांमध्ये मृत व्यक्तीचे कपडे जाळण्याची प्रथाही आहे.
आपण अनेकवेळा पाहिलं असेल की, कोणाचा मृत्यू झाल्यानंतर घरातील लोक रात्रभर मृतदेहाला एकटं सोडत नाहीत. मृतदेहाला एकटं न सोडण्याच्या प्रश्नासह अशा अनेक गोष्टी विधी आहेत, ते का केली जातात. त्याचा अर्थ काय याचे उत्तर आपल्यातील अनेकांना माहिती नाहीये. जर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कपड्यांचे काय करावे? ते आठवण म्हणून जपून ठेवावेत, नातेवाईकांना द्यावेत की इतरांना वाटून टाकावेत?
भारतीय परंपरांमध्ये मृत व्यक्तीच्या वस्तू स्वतःकडे न ठेवण्याचा सल्ला का दिला जातो. आणि काही कपडे जाळून का टाकले जातात, तर काही कपडे इतरांमध्ये का वाटले जातात? अशी प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येत असतात. सदगुरू यांनी आपल्या एका कार्यक्रमात या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
सद्गुरूंनी मृत्यूबाबतच्या या समजेला, मृत व्यक्तीच्या वस्तू हाताळण्याच्या पारंपरिक पद्धतीशी जोडले. एखाद्या व्यक्तीच्या शरीराशी घनिष्ठ संबंध असलेल्या वस्तूंमध्ये त्यांच्या शारीरिक अस्तित्वाचे काही अंश टिकून राहू शकतात. "आज आपण पाहतो की, आपल्या जुन्या कपड्यांमधून डीएनए मिळवता येऊ शकतो, असे म्हणत त्यांनी स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीने परिधान केलेल्या किंवा स्पर्श केलेल्या वस्तूंमध्ये त्यांच्या शारीरिक ओळखीचा काही अंश शिल्लक राहतो,असं सदगुरू म्हणाले.
पोलिसांकडून श्वान हजारो जॅकेट्समधून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे जॅकेट शोधून काढू शकतो, कारण त्यावर त्या व्यक्तीच्या गंधाचे अंश शिल्लक राहिलेले असतात. या उदाहरणाद्वारे सद्गुरू म्हणाले की, कपड्यांचा त्या व्यक्तीशी असलेला संबंध कायम राहू शकतो ज्याने ते परिधान केले होते. त्यांच्या मते, अशा वस्तूंमध्ये विविध प्रकारच्या ऊर्जा टिकून राहू शकतात.
सद्गुरूंनी सांगितले की, हा निर्णय त्या वस्तू आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. सर्वच वस्तू जाळून टाकणे म्हणजे वाया घालवण्यासारखे ठरेल. आजच्या काळात, जेव्हा लोकांकडे कपडे आणि पादत्राणांचा मोठा साठा असतो. घरातील व्यक्तींनी मृत व्यक्तीच्या शरीराच्या अत्यंत जवळच्या संपर्कात असलेल्या वस्तू, विशेषतः अंतर्वस्त्रे, जाळून टाकावेत. इतर कपडे असतील तर ते व्यक्तीच्या निधनानंतर साधारण १० दिवसात धुवून टाका. आणि ते दुसऱ्यांना दान करून टाका. परंतु ते सर्व कपडे एका व्यक्तीला किंवा कुटुंबाला देऊ नये. मृत व्यक्तीच्या वस्तू एकाच ठिकाणी केंद्रित राहू नयेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.