येत्या 26 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:39 वाजता अष्टमी तिथीची सुरुवात होत आहे. तर 27 ऑगस्ट रोजी पहाटे 2:19 वाजता अष्टमी तिथी समाप्त होईल. त्यानंतर 27 तारखेलाच सर्वत्र उंच मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यास सुरुवात होते. दहीहंडीचा उत्सव राज्यभर आणि देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. तुम्ही सुद्धा हा सण आनंदात साजरा करत असाल.
एकवर एक असे एकूण 7 ते 8 आणि काही ठिकाणी अगदी 9 थर रचून सुद्धा दहीहंडी फोडली जाते. विविध परिसरातील गोविंदा या दिवशी हंडी फोडण्यासाठी सज्ज होतात. मैदानाच जिथे हंडी बांधली असेल तिथे सुंदर आणि मोठ्या आवाजातील श्री कृष्णाची गाणी लावली जातात. या गाण्यांवर लहान मुलांसह तरुण मुलं आणि मुली ताल धरतात. आता दहीहंडी फुटली की, प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी या हंडीचा तुकडा घेऊन जातात. हंडीचा तुकडा घरातील तांदळामध्ये ठेवलेला असतो. आता असे का केले जाते त्याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
शुभ आणि समृद्धीचे प्रतीक
दहीहांडी ही हिंदू धर्मात अतिशय शुभ मानली जाते. तसेच प्रत्येक दहीहंडीला समृद्धीचं प्रतिकही मानतात. मातीपासून बनलेली दहीहंडी फुटली की, सर्व लहान मुलं हंडीचे तुकडे गोळा करतात आणि आपल्या तांदळाच्या डब्ब्यात ठेवतात. असे केल्याने घरात भरभराट वाढते असं म्हटलं जातं. तसेच या तुकड्याच्या माध्यमातून घरी धनलक्ष्मी येते असं म्हटलं जातं.
पवित्रतेचं प्रतीक
दहीहंडीचे तुकडे पवित्रतेचं प्रतीक मानले जातात. या तुकड्यामुळे आपल्या घरातील धनसंपत्ती वाढते. शिवाय ज्या धान्याच्या डब्ब्यात हा तुकडा आहे तेथे कधीच धान्याचा तुटवडा येत नाही. घरात वाद, कलह आणि वायफळ पैसे खर्च होणे थांबतं.
भरभराटीचे प्रतीक
दहीहंडी हा सण फक्त मौजमजेसाठी नसतो. या सणामुळे आपल्या रोजच्या आयुष्यावर सुद्धा मोठा परिणाम होतो. दहीहंडीचा तुकडा किचनमध्ये तुम्ही तांदुळ किंवा अन्य कोणत्याही धान्यात ठेवू शकता. त्याने घरात भरभराट कायम राहते. तसेच सुख शांती आणि समृद्धी येते.
तांदूळ खराब होत नाही
तांदूळ हे असं धान्य आहे जे एक महिन्यानंतर खराब होऊ लागते. या धान्यात किड तयार होते. त्यापासून वाचण्यासाठी व्यक्ती विविध उपाय आणि किटकनाशकाचा वापर करतात. यात तुम्ही तांदूळ खराब होऊ नये म्हणून दहीहंडीचा एक तुकडा सुद्धा ठेवू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.