National Doctor's Day History : दरवर्षीप्रमाणेच आजही देशभरात राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जात आहे. वेळोवेळी आपले प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. डॉक्टरांना आपले प्राण वाचवणारे व मानवी आरोग्यासाठी डॉक्टरांचे योगदान हे अपेक्षेपलीकडील आहे.
हा दिवस समाजातील मोठ्या प्रमाणावर सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी साजरा करण्याचा दिवस आहे. गेल्या ३२ वर्षांपासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. भारतात हा दिवस १ जुलै रोजी साजरा केला जातो. जाणून घेऊया हा का सुरू झाला, त्याचे महत्त्व आणि यावर्षीची थीम जाणून घेऊया.
1. डॉक्टर्स डेचा इतिहास (History)
१ जुलै १९९१ पासून देशात डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रख्यात चिकित्सक शिक्षणतज्ज्ञ आणि बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी पाटणा, बिहार येथे झाला. 1976 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सर्व योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ जुलै हा दिवस 'डॉक्टर्स डे' म्हणून साजरा (Celebrate) केला जातो.
2. यंदाची थीम
दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर्स डे वेगळ्या थीमने साजरा केला जातो. यंदा २०२३ ला याची थीम 'फॅमिली डॉक्टर्स ऑन द फ्रंट लाइन' अशी ठेवण्यात आली आहे.
3. उद्देश
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश डॉक्टरांचे कर्तव्य, महत्त्व आणि योगदान याबद्दल लोकांना जागरुक करणे हा आहे. हा दिवस आपल्याला डॉक्टरांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो.
4. महत्व
डॉक्टरांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. मुलाच्या जन्मापासून ते निरोगी जीवनशैली जगण्यापर्यंत डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची असते. याची जाणीव लोकांना व्हावी यासाठी डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.