World Music Day Saam Tv
लाईफस्टाईल

World Music Day: जागतिक संगीत दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व

World Music Day History and Significance: लहानापासूंन ते मोठ्यापर्यंत सर्वांना संगीत ऐकणे खूप आवडते. मात्र ज्यांना संगीत ऐकणे अत्यंत आवडते त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

२१ जून हा दिवस जगभरात जागतिक संगीत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक संगीतप्रेमींसाठी आजचा दिवस अतिशय विशेष असा मानला जातो. संगीत ऐकल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास विशेष मदत होते. संगीतामुळे व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. अलिकडेच संगीताचा वापर थेरपी म्हणूनही करण्यात येतो. आजच्या विशेष दिनी संगीताशी निगडीत अशात काही फायद्यांविषयी आणि यांचे जरभर संगीत दिवस का साजरा केला जातो ते जाणून घेऊयात.

जागतिक संगीत दिवस....

साधारण १९८२ मध्ये फ्रान्समध्ये फेटे दे म्सुसिक हा संगीत विशेष महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर जगभर आजचा दिवस जागतिक संगीत दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र संगीत ऐकण्याचे तुम्हाला विविध फायदे (benifits)माहिती आहेत का? चला तर जाणून घेऊयात संगीत ऐकण्याचे अनेक फायदे.

. दररोज संगीत ऐकल्याने व्यक्तीच्या मेंदूमध्ये आनंदी हार्मोन्स तयार होतात,ज्यामुळे व्यक्तीचा स्वभाव आनंदी राहतो. दररोज जाणवणारा तणाव, नैराश्य तसेच व्यक्ती अनेक चिंतापासून दूर राहतो. शिवाय शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

. तुम्ही दररोज संगीत ऐकल्याने तुमच्या मनाला आराम मिळण्यास मदत होते शिवाय अनेक संगीत एक ध्यानाचा प्रकार आहे.

. अनेक व्यक्तींना झोपेची समस्या जाणवते. अशा वेळेस तुम्ही संगीत(Music ऐकले तर तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते. मात्र शांत झोपेसाठी तुम्ही एखादे शांत संगीत ऐकण्यास प्राध्यान द्यावे.

. संगीत ऐकल्याने मेंदू (brain)सक्रिय राहण्यास मदत होते शिवाय तुम्ही एखादे काम करताना संगीत ऐकले तर ते काम सहज आणि अधिक ऊर्जेने ते तुम्ही काम करु शकता.

. संगीत ऐकल्याने व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारण्यास विशेष मदत मिळते. शिवाय तुमचे हृदय निरोगी राहण्यासही मदत मिळते.

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सूनेची क्रूरता! आईसोबत मिळून सासूला झोडलं, जमिनीवर पाडून झिंज्या उपटल्या; VIDEO व्हायरल

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

Nashik : गोदावरीला पूर; जायकवाडी धरण ५२ टक्के भरलं | VIDEO

Mrunal Thakur Photos : जादू तेरी नजर; मृणालचं सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

SCROLL FOR NEXT