World Milk Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

World Milk Day 2023 : दरवर्षी 1 जूनला 'जागतिक दूध दिवस' का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Milk Day : दुधाचे सेवन शरीरासाठी बरेच फायद्याचं ठरतं. दुधामधून अनेक आवश्यक पौष्टिक पदार्थ मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

International Milk Day 2023 : दुधाचे सेवन शरीरासाठी बरेच फायद्याचं ठरतं. दुधामधून अनेक आवश्यक पौष्टिक पदार्थ मिळतात. दुधाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि ते व्यर्थ जाऊ देऊ नये म्हणून दरवर्षी 1 जून हा जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. आजही भारतात असे बरेच लोक आहेत ज्यांना दूध मिळत नाही, यामुळे त्यांच्या शरीरात पोषणाचा अभाव आहे. चला तर मग जाणून घेऊया जागतिक दूध दिनाचे महत्त्व.

जागतिक दूध दिनाचा उद्देश काय आहे?

दूध दिवस साजरा (Celebrate) करण्याचे उद्दिष्ट लोकांना त्याचे फायदे आणि महत्त्व, तसेच दुधाचा स्थानिक अर्थव्यवस्था आणि समुदायांना कसा फायदा होतो याबद्दल शिक्षित करणे हे होते. याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. FAO च्या मते, सुमारे सहा अब्ज लोक दुग्धजन्य पदार्थ वापरतात. एवढेच नाही तर डेअरी व्यवसायामुळे एक अब्जाहून अधिक लोकांचे जीवनमान चालते.

थीम काय आहे?

दरवर्षी कोणत्याही विशेष उद्देशाने साजरे होणाऱ्या या दिवसांसाठी खास थीमही ठरवली जाते. दरवर्षी जागतिक दूध (Milk) दिनाची थीम ठरवली जाते. यावर्षीच्या थीमबद्दल बोलताना, पौष्टिक अन्न आणि उपजीविका प्रदान करताना ते पर्यावरणीय पाऊलखुणा कसे कमी करत आहेत यावर प्रकाश टाकणे हा या वर्षीचा उद्देश आहे.

राष्ट्रीय दूध दिवस कधी साजरा केला जातो?

जगभरात 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो, तर भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस साजरा केला जातो. भारतात, हा दिवस डॉ. वर्गीस कुरियन यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो, ज्यांना भारतात श्वेतक्रांतीचे जनक म्हणूनही ओळखले जाते. त्यांना 'मिल्क मॅन' म्हणूनही ओळखले जाते.

वर्गीस कुरियन कोण आहेत?

वर्गीस कुरियन यांना भारतातील (Indian) श्वेतक्रांतीचे जनक म्हटले जाते, त्यांना 'मिल्क मॅन' म्हणूनही स्मरले जाते. कारण त्यांच्या योगदानामुळे भारत आज दुध आयात करणारा देश बनून जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक देशांपैकी एक बनला आहे. कुरियन यांनी 1970 मध्ये श्वेतक्रांती सुरू केली, ज्याचा उद्देश भारतातील दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी होता. 1965 ते 1998 पर्यंत, डॉ. वर्गीस कुरियन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष होते आणि या काळात त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्याचाच परिणाम म्हणजे आज भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पादन होत आहे.

श्वेतक्रांती म्हणजे काय?

कुरियन यांनी 1970 मध्ये श्वेतक्रांती सुरू केली. भारतातील दुधाच्या उत्पादनाला चालना देणे हा त्याचा उद्देश होता. 1965 ते 1998 या काळात डॉ. वर्गीस कुरियन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष होते. यादरम्यान त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात दूध उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT