Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Dhanshri Shintre

वागणुकीत अजब बदल

तुमच्यात किंवा आसपासच्या व्यक्तीत अचानक वागणुकीत अजब बदल जाणवत आहेत का? हे मानसिक त्रासाचे लक्षण असू शकते.

गंभीर परिणाम

तर अशी 5 सुरुवातीची मानसिक लक्षणे जाणून घ्या, जी दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

वागणुकीत अचानक बदल

वागणुकीत अचानक बदल होणे, जसे कुठलाही कारण नसताना खूप हसणे किंवा पूर्णपणे शांत होऊन बसणे.

एखाद्याला सतत शंका येणे

एखाद्याला सतत शंका येणे किंवा सगळे विरोधात आहेत अशी भीती वाटणे ही गंभीर मानसिक त्रासाची निशाणी असू शकते.

राग अनावर होणे

अचानकच राग अनावर होणे किंवा कारण नसताना रडणे हे भावनिक असंतुलन दर्शवणारी गंभीर लक्षणे मानली जातात.

आवाज ऐकू येणे

एखाद्याला असे आवाज ऐकू येत असतील जे इतरांना ऐकू येत नाहीत, तर ते मानसिक त्रासाचे संकेत असू शकतात.

स्वतःशी संवाद साधणे

स्वतःशी सतत संवाद साधणे आणि त्याला उत्तर देणे हे मनोविकार किंवा मानसिक असंतुलनाचे लक्षण मानले जाऊ शकते.

अपयशी समजणे

स्वतःला सतत अपयशी समजणे किंवा स्वतःला देवत्व देणे ही मानसिक असंतुलनाची गंभीर आणि धोकादायक लक्षणे असू शकतात.

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे; वेळेवर लक्षणे ओळखून उपचार घेणे हेच योग्य आणि शहाणपणाचे पाऊल ठरते.

NEXT: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

येथे क्लिक करा