Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Dhanshri Shintre

कामाचा ताण

आजच्या धावपळीच्या आयुष्यात कामाचा ताण, वैयक्तिक समस्या आणि वेळ कमी असल्यामुळे मानसिक तणाव सामान्य झाला आहे.

मानसिक उपाय

तुम्हाला माहिती आहे का? फक्त ५ मिनिटांत तुम्ही ताण कमी करू शकता. येथे काही त्वरित मानसिक उपाय आहेत.

श्वास घेण्याचा तंत्र

ही वैज्ञानिक श्वास तंत्र आहे, ज्यात ४ सेकंद श्वास घेऊन ७ सेकंद धरून ८व्या सेकंदाला हळू सोडतात.

ग्राउंडींग ट्रिक

ताण वाढल्यावर, मनाला परत आणण्यासाठी तुमच्या जवळपासच्या ५ वस्तू पहा, ४ वस्तूंना स्पर्श करा, ३ ऐका, २ वास घ्या, १ चाखा; मन शांत होते.

स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला

जर तुम्ही वारंवार "मी अपयशी" म्हणत असाल, तर ते बदलून "मी यशस्वी होऊ शकतो" असे सकारात्मक विचार करा, त्यामुळे मनाला शांती मिळते.

चेहऱ्यावर हसू आणा

जर तुम्हाला आवडत नसेल तरी ३० सेकंद जोरजोरात हसा, यामुळे मेंदू आनंदी असल्याचा सिग्नल देऊन तुमचा मूड सुधारतो.

सगळ्यांपासून ब्रेक घ्या

फोन, लॅपटॉप आणि सोशल मीडियापासून ५ मिनिटांचा ब्रेक घ्या; बाहेर पाहा, दीर्घ श्वास घ्या, शांत रहा, मन ताजेतवाने होईल.

स्ट्रेचिंग करा

बसून ताण जाणवल्यास उभे रहा, स्ट्रेच करा, खांदे फिरवा किंवा थोडे चालून घ्या; हे शरीरातील कॉर्टिसोल कमी करते आणि तणाव दूर करतो.

NEXT: स्ट्रेसमुळे आरोग्यावर परिणाम होतोय? चिंता कमी करण्यासाठी 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

येथे क्लिक करा