Dhanshri Shintre
दररोज १५ मिनिटे बाहेर फिरल्याने ताजेतवाने वाटते, मन प्रसन्न राहतं आणि मानसिक तणाव दूर होतो.
चालणं, धावणं, सायकलिंग किंवा कोणताही हलका व्यायाम हार्मोन्स संतुलित करतो आणि मूड सुधारतो.
कमी झोप ही चिंता आणि तणाव वाढवणारी प्रमुख कारणांपैकी एक आहे. दररोज ७-८ तासांची झोप आवश्यक आहे
कॅफिनच्या जागी हर्बल टी घेतल्यास मन अधिक शांत राहतं आणि नैसर्गिकरित्या तणाव कमी होतो.
जवळच्या व्यक्तींसोबत मन मोकळं करा. बोलणं हे तणाव कमी करण्याचं प्रभावी माध्यम आहे.
सोशल मीडियापासून दूर राहून डिजिटल डिटॉक्स केल्याने ताण कमी होण्यास मदत होते.
पचायला हलका, पोषणमूल्ययुक्त आहार तणाव कमी करण्यास मदत करतो.
संगीत ऐकणं, पुस्तक वाचन, चित्रकला किंवा स्वयंपाक यासारख्या छंदांत रमणं उपयोगी ठरतं.