Dhanshri Shintre
तुम्हाला उष्णतेमुळे घामोळा होत असेल तर हे घरगुती उपाय करून बघा, नक्की आराम मिळेल.
या घरगुती उपायांनी घामोळ्यामुळे होणारी खाज, लालसरपणा आणि त्वचेची जळजळ प्रभावीपणे कमी होते.
चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि ती घामोळ्यांवर लावा.
मुलतानी माती पाण्यात मिसळून पेस्ट करा आणि ती घामोळ्यांवर 30 मिनिटे लावून ठेवा.
कोरफडीचा गर घामोळ्यांवर लावल्याने आराम मिळतो.
काकडीचे तुकडे घामोळ्यांवर चोळा किंवा काकडीचा रस घामोळ्यांवर लावा.
कडुलिंबाची पाने वाटून पेस्ट तयार करा आणि ती घामोळ्यांवर लावा.
घाम येऊ नये, यासाठी सैल कपडे घाला, उन्हात जास्त वेळ फिरू नका आणि पुरेसे पाणी प्या.
घाम येऊ नये, यासाठी सैल कपडे घाला, उन्हात जास्त वेळ फिरू नका आणि पुरेसे पाणी प्या.