आजकाल कॅन्सर सारखा आजार तरूण वयातही होताना दिसतो. काही प्रमाणात चुकीच्या जीवनशैलीमुळे लहान मुलांनाही याचा फटका बसतो. मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये हाडांचा कॅन्सर हा सर्वात कठीण ओळखता येणारा कॅन्सर मानला जातो. नवीन संशोधनात असे दिसून आलंय की, या आजाराचं निदान उशीरा होतं.
नॉटिंगहॅम विद्यापीठाने जवळपास 2,000 रुग्णांवर केलेल्या अभ्यासानुसार, हाडांचा कॅन्सर हा सर्व बाल कॅन्सरमध्ये सर्वाधिक उशिरा निदान होणारा आजार आहे. या विलंबामुळे ट्यूमरचा आकार वाढतो. परिणामी ते शरीरात पसरतात आणि उपचार अधिक कठीण होतात.
नॉटिंगहॅम विद्यापीठाच्या संशोधकांनी जवळपास 2,000 रुग्णांची माहिती घेतली. यामध्ये असं दिसून आलं की, हाडांचा कॅन्सर असलेल्या मुलांना इतर कॅन्सरच्या तुलनेत सर्वाधिक सामना करावा लागतो.
बहुतेक लहान मुलांना होणाऱ्या कॅन्सरची लक्षणं काही आठवड्यांत ओळखली जातात. पण हाडांचा कॅन्सर ओळखण्यासाठी सरासरी 4.6 आठवडे लागतात. काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये कुटुंबांना सहा वर्षांपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागली. 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना सर्वाधिक विलंबाचा सामना करावा लागला, सरासरी 8.7 आठवडे.
हाडांचा कॅन्सर असलेल्या रुग्णांसाठी हा विलंब 12.6 आठवडे म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त होता. तुलनेत, बाळांना 3.7 आठवड्यांत निदान झालं तर किडनीच्या कॅन्सर असलेल्या मुलांना फक्त दोन आठवड्यांत निदान झाल्याचं आहे. यावरून स्पष्ट होतं की, वय आणि कॅन्सरच्या प्रकारानुसार, निदानात मोठा फरक पडतो. ज्यामुळे उपचार उशिरा होतात आणि कुटुंबांवर अतिरिक्त मानसिक व शारीरिक ताण येतो.
ऑस्टिओसार्कोमा हा तरुणांमध्ये सर्वाधिक आढळणारा हाडांचा कॅन्सर आहे. तो प्रामुख्याने पाय आणि हातांच्या लांब हाडांमध्ये, विशेषतः ग्रोथ प्लेट्सजवळ विकसित होतो. तो प्रामुख्याने फेमर, टिबिया आणि ह्युमरस यांना प्रभावित करतो.
डॉक्टरांना अजूनही पूर्णपणे समजलेलं नाही की, ऑस्टिओसार्कोमा का होतो. पण हा आजार हाडांच्या पेशींमधील DNA मध्ये झालेल्या बदलांशी संबंधित आहे. Li-Fraumeni सिंड्रोम किंवा हेरिडिटरी रेटिनोब्लास्टोमा असलेल्या मुलांना ऑस्टिओसार्कोमा होण्याची शक्यता जास्त असते.
अमेरिकन कॅन्सर सोसायटी (ACS)नुसार, ऑस्टिओसार्कोमाची सुरुवातीची लक्षणं अनेकदा सामान्य आजारांसारखी दिसतात, ज्यामुळे निदान उशिरा होतं. सर्वात सामान्य लक्षणांमध्ये सतत हाड किंवा सांध्यात वेदना, विशेषतः रात्री वाढणारी वेदना, सूज किंवा गाठ यांचा समावेश होतो
सतत हाड किंवा सांध्यात वेदना
प्रभावित भागाभोवती सूज
हाडाभोवती गाठ किंवा गुठळी दिसणं
किरकोळ कारणाशिवाय हाड मोडणे
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.