Evening Snacks saam tv
लाईफस्टाईल

Smart Snacking Tips: हेल्दी स्नॅक्स असूनही वजन वाढतंय, या छोट्या चुका बिघडवत आहेत तुमचं डाएट

hidden calories in healthy snacks explained: हेल्दी स्नॅक्स खाऊनही वजन वाढतंय का? पोर्शन कंट्रोल, लिक्विड कॅलरीज, लो-फॅट पदार्थ आणि माइंडलेस ईटिंग यांसारख्या सवयींमुळे वजन वाढू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल फिटनेसकडे लक्ष देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र तरीही हेल्दी समजून घेतलेल्या काही सवयीच वजन वाढवण्याचं कारण ठरत असल्याचं चित्र समोर येतंय. विशेषतः स्नॅकिंगच्या बाबतीत अनेकजण याचुका करत आहेत.

वजन कमी करण्यासाठी दिवसात तीन वेळा जेवणासोबत हलके-फुलके स्नॅक्स घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे लोक समोसे-बिस्किटं टाळून नट्स, डार्क चॉकलेट, पीनट बटर यांसारखे पर्याय निवडतात. मात्र, हे पदार्थ हेल्दी असले तरी त्यात कॅलरीज असतातच. योग्य प्रमाणात न खाल्ल्यास हेच पदार्थ वजन वाढवू शकतात.

पोर्शन कंट्रोल

एखादा पदार्थ हेल्दी आहे असं ठरलं की, त्याचं प्रमाण किती घ्यायचं याकडे दुर्लक्ष होतं. बदाम, अक्रोड यांसारख्या पदार्थांमध्ये पोषण घटक भरपूर असतात, पण कॅलरीजही जास्त असतात. दिवसभर वारंवार तेच खाल्ल्यास शरीरात कॅलरीचं प्रमाण वाढतं.

लो-फॅट आणि शुगर-फ्री उत्पादनांचा प्रभाव

बाजारात उपलब्ध असलेले डाएट मिक्सचर, लो-फॅट दही किंवा शुगर-फ्री बिस्किटं ही आरोग्यासाठी चांगली वाटतात. मात्र चव टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये साखर, आर्टिशिफीयल स्वीटनर्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्स मिसळले जातात. हे घटक शरीरातील इन्सुलिन वाढवतात आणि त्यामुळे फॅट्स वाढतात.

लिक्विड कॅलरीजची समस्या

स्मूदी, फ्रुट ज्यूस किंवा नारळ पाणी हे हेल्दी पर्याय मानले जातात. पण फ्रुट काढताना त्यातील फायबर कमी होतं. त्यामुळे साखर शरीरात पटकन शोषली जाते आणि त्याचा परिणाम वजनावर होऊ शकतो.

माइंडलेस ईटिंगचा धोका

काम करताना किंवा टीव्ही पाहताना खाण्याची सवय अनेकांमध्ये दिसते. अशावेळी किती खातोय याची जाणीव राहत नाही. मखाना सारखा हेल्दी पर्यायही जर जास्त प्रमाणात, विशेषतः तुपात भाजून खाल्ला, तर वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं.

स्मार्ट स्नॅकिंगसाठी उपाय

तज्ज्ञांच्या मते, स्नॅक्स नेहमी छोट्या वाटीत घ्यावेत, म्हणजे प्रमाण नियंत्रणात राहतं. स्नॅकमध्ये प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थ असावेत. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. अनेकदा तहान लागलेली असताना आपण खाणं सुरू करतो. त्यामुळे आधी एक ग्लास पाणी पिणं फायदेशीर ठरतं. तसंच बाजारातील डाएट नमकीन टाळून घरचे भाजलेले चणे किंवा उकडलेले स्प्राउट्स खाणं अधिक चांगला पर्याय आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा मोठा दणका! बड्या निष्ठावंताने सोडली साथ, 250 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये करणार प्रवेश

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक आकर्षण, पवना तलावाने वेढलाय 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: वादळी पावसाने मेंढपाळांचे कंबरडे मोडले, लाखणगावात पशुधनासह संसार उघड्यावर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून नाव कट झाले? एका मिनिटात असे करा चेक

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंनी वीकेंडला मारली बाजी; 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, आतापर्यंत किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT