Partner who works in the IT sector : प्रत्येकजण आपल्याला हवा तसा जोडीदार शोधण्यात व्यस्त आहे. लग्न म्हटलं की, प्रत्येकाचे आपल्या भावी जोडीदाराला घेऊन अनेक अपेक्षा आहेत. जोडीदार शोधण्यासाठी बरेच तरुण मंडळी डेटिंगसारख्या अॅप्सचा वापर करताना दिसून येत आहे.
कोरोना काळात बऱ्याच तरुणींचा कल हा आयटी क्षेत्रातील तरुणांकडे वळत आहे असे एका सर्व्हेत दिसून आले. पण याचे नेमके कारण काय याबाबत आम्ही काही तरुणींशी चर्चा केली त्यावर त्यांनी सांगतीले की, कोरोना काळात बऱ्याच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम दिले. त्यातीलच सगळ्याच चर्चेत असणारे क्षेत्र अर्थात IT. सध्या IT कंपन्या भरपूर आहेत त्यामुळे सर्वच कंपन्यांचे एक वेगळे work कल्चर आहे.
या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे आयुष्य अगदी सोपे व साधे आहे. कंपनी नुसार त्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीचं जीवनमान अवलंबून आहे. परंतु एकंदरीत IT कंपनी मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच आयुष्य इतर कंपनीत काम करणाऱ्या पेक्षा खूप सुखकर असे म्हटले जाते. परंतु, यात काही कारणे अशी देखील आहेत जी त्यांना तंतोतंत लागू पडतात. ती खालीलप्रमाणे
1. IT Sector मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना शारीरिक श्रमापेक्षा बुध्दीचा वापर अधिक करावा लागतो. ज्यामुळे त्यांना थकवा कमी येतो. तसेच कमी ऊर्जा असताना सुद्धा तुम्ही तुमचे काम करु शकता.
2. त्यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर तो देखील चांगला असतो. तसेच त्यासोबत इतर अनेक सवलती देखील मिळतात. त्यांना महिन्याला परफॉर्मन्स बोनस, increment, ई. चांगल्या प्रमाणात मिळतात पण त्यासाठी आपले प्रयत्न प्रामाणिक हवेत.
3. सुट्ट्याच्या बाबतीत हे सरकारी नौकरीला मागे टाकणारे आहे. तसेच वर्षातून किमान एकदा तरी फॅमिली सोबत १-२ ट्रीप अगदी आरामात करता येतात. शिवाय शनिवार रविवार सुट्टी असतेच त्यामुळे घरची इतर कामेही सहज साध्य होतात.
४. मोठ्या कंपनीत तुम्हाला mediclaim कव्हर सारखे benefits मिळतात त्यामुळे तुमच्या सोबतच तुमच्या परिवाराची आरोग्याची देखील देखभाल कंपनी करते असे म्हणायला हरकत नाही.
५. काही कंपनीत सकाळच्या नाश्त्या पासून संध्याकाळच्या स्नॅक्स पर्यंत फॅसिलिटी असतात तेही मोफत. शिवाय मनोरंजनासाठी अनेक खेळ उपलब्ध असतात त्यामुळे जास्त वेळ बसून कंटाळा आला असेल तर थोडा विरंगुळा म्हणून तुम्ही तुमच्या आवडीचा खेळ खेळा, टीव्ही बघा, वर्तमानपत्र वाचत बसा, तेही न लाजता कारण असे अनेक लोक तिथे बसलेले असतात.
६. मनुफॅक्चरींग कंपनीत साधारण वर्षभर काम केलंय पण तिथलं वातावरण अगदीच वाईट होतं. त्या मानाने IT कंपनीत एक शिष्टाचार पाळला जातो आणि आपण कुठल्याही पातळीवर जाऊन बोलू शकत नाही कारण साधारण तुम्हाला अनेक परदेशी किंवा देशी क्लायंट सोबत काम करावे लागते आणि त्यात योग्य ती भाषा वापरणे बंधनकारक असते.
७. असे अनेक फायदे आहेत पण फक्त आपण स्वतःला किती तयार ठेवतो त्यावर सर्व अवलंबून आहे. जोपर्यंत शिकायचं थांबवत नाही तोपर्यंत या क्षेत्रात तुम्हाला मरण नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.