Beard Men Freepic
लाईफस्टाईल

Beard Men: दाढी असलेले पुरुष मुलींना का आवडतात? काय आहे त्यामागील आकर्षणाचे गुपित

Beard And Beauty: सध्या पुरुषांमध्ये दाढी ठेवण्याचा ट्रेंड वाढत असून महिलांमध्ये दाढी असलेल्या पुरुषांची विशेष लोकप्रियता आहे. संशोधनानुसार, दाढीमुळे पुरुष अधिक आकर्षक वाटतात, त्यामुळे महिलांचा कल अशा पुरुषांकडे अधिक असल्याचे आढळले आहे.

Dhanshri Shintre

सध्या मुलांमध्ये दाढी ठेवण्याचा ट्रेंड जोरदार वाढला असून, क्लीन-शेव्ह करुन राहावे की दाढी ठेवावी यावर अनेक जण गोंधळलेले असतात. प्रत्येकाच्या लूकबद्दल वेगवेगळी मते असली तरी एका अभ्यासानुसार मुलींना दाढी असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात. क्लीन-शेव्हपेक्षा दाढी असलेले पुरुष जास्त प्रभावी दिसतात, असे अभ्यासाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दाढी ठेवण्याचा ट्रेंड फक्त फॅशन नसून महिलांमध्ये लोकप्रिय होण्याचा एक महत्त्वाचा घटक ठरत आहे.

दाढी असलेले पुरुष अधिक स्थिर नात्यांमध्ये राहण्यास प्राधान्य देतात, तर क्लीन-शेव्ह दाढी केलेले पुरुष अनेक जोडीदार शोधण्याचा कल ठेवतात. यामुळे महिलांना क्लीन-शेव्ह पुरुषांपेक्षा दाढी असलेले पुरुष अधिक आवडतात. दाढीमुळे स्थैर्य व परिपक्वतेचा संदेश मिळतो, जो महिलांना आकर्षित करतो. दाढीचा हा ट्रेंड केवळ फॅशन नसून, नातेसंबंधांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे समोर आले आहे.

क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी युरोप आणि अमेरिकेत सुमारे ८,५०० महिलांवर सर्वेक्षण करून दाढी असलेल्या आणि नसलेल्या पुरुषांबाबत त्यांची मते जाणून घेतली. या अभ्यासात असे दिसून आले की महिलांना लग्नासाठी दाढी असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात, कारण ते परिपक्वता आणि स्थैर्य दर्शवतात. तर क्लीन-शेव्ह दाढी केलेले पुरुष महिलांच्या मते कॅज्युअल रिलेशनशिपसाठी अधिक योग्य ठरतात.

दाढी पुरुषाला प्रौढ आणि सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित बनवते, तसेच क्लीन-शेव्ह दाढीचेहऱ्यावर आकर्षक दिसते. क्वीन्सलँड विद्यापीठाच्या २०१६ च्या अभ्यासानुसार, लांब दाढी असलेले पुरुष दीर्घकालीन आणि खोल नातेसंबंध निर्माण करण्याची अधिक शक्यता दर्शवतात. दाढीच्या या प्रभावामुळे पुरुषांची व्यक्तिमत्वातील परिपक्वता आणि स्थैर्य अधिक स्पष्ट होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Gaikwad: जमीन विकून आमदाराची 25 लाखांची मदत, संजय गायकवाडांच्या मदतीवर काँग्रेसचा आक्षेप

Crime: विम्याच्या पैशांसाठी आई-वडील आणि बायकोची हत्या, तिहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसही चक्रावले

Wednesday Horoscope : वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाणार; ५ राशींच्या लोकांना शत्रूंचा त्रास संभवणार

Hair Care: केसाच्या अनेक समस्यांवर एक रामबाण उपाय; ताकाने केस धुण्याचे फायदे माहितीये का?

Maharashtra Politics: मीच बाळासाहेब ठाकरे" संदेश देताय का? – राऊतांचा शिंदेंना सवाल

SCROLL FOR NEXT