Kargil Vijay Diwas 26 July Saam tv
लाईफस्टाईल

Kargil Vijay Diwas Story: पाकिस्तानला धुळ चारत भारताने 'कारगिल' जिंकलं, चित्तथरारक कहाणी आजही आणते डोळ्यात पाणी...

Kargil Vijay Diwas Story In Marathi : देशभरात दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

India Pakistan Kargil War History:

देशभरात दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. 1999 च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानाला पळता भुई करुन सोडले. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी विजयाचा व गौरवाचा दिवस ओळखला जातो.

या युद्धात अनेक जवान शहीद झाले पण कारगिल युद्धात भारताला विजय मिळाला. भारताचा दैदिप्यमान विजय आणि भारतीय जवानांचे हौतात्म्य इतिहासाच्या पानात आजही नोंदले गेले आहे. कारगिल विजय आणि हुतात्म्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

26 जुलै 1999 हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून का साजरा केला जातो ते जाणून घ्या, या दिवसाचा इतिहास काय आहे जो प्रत्येक भारतीयांसाठी (Indian) अभिमानाचा दिवस बनला आहे.

1. भारत पाक करार

फाळणीनंतरही दोन्ही देशांमधील संघर्ष सुरूच होता. परिणामी १९७१ मध्ये भारत-पाक (Pakistan) युद्ध झाले. मात्र, त्यानंतरही दोन्ही देशांमध्ये सशस्त्र युद्धे झाली. भारत आणि पाकिस्तानने फेब्रुवारी 1999 मध्ये काश्मीरवर (Kashmir) सुरू असलेला वाद कमी करण्यासाठी शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पण नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत पाकिस्तानाची घुसखोरी सुरूच होती.

2. कारगिल युद्धाचा इतिहास

1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमधील सीमा विवादामुळे कारगिल युद्ध सुरू झाले. पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीतील कारगिलची शिखरे काबीज केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' केले.

3. 60 दिवस चाललेल्या कारगिल युद्धात

भारतीय शूर सैनिकांनी पाकिस्तानी घुसखोरांचा पाठलाग करताना टायगर हिल आणि इतर चौक्यांवर कब्जा केला. कारगिल, लडाखमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील हे युद्ध 60 दिवसांपेक्षा जास्त काळ चालले. या युद्धात भारताचे २ लाख सैनिक सहभागी झाले होते.

4. भारतीय लष्कराच्या कारगिल शौर्य गाथा

सैन्याचे मिशन यशस्वी करण्यासाठी अनेक शूर सुपुत्रांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यापैकी एक कॅप्टन विक्रम बत्रा. 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने युद्धात विजय घोषित केला. कारगिल युद्धात भारतीय लष्कराच्या ५२७ जवानांच्या हौतात्म्यासोबतच पाकिस्तानचे ३५७ जवानही शहीद झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT