Monsoon food tips, how to save pickle from fungus  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पावसाळ्यात लोणच्याला बुरशी का लागते ?

आंबट-गोड लोणच्याला बुरशी लागू नये यासाठी काय कराल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : पावसाळ्यात अन्नपदार्थांना बुरशी लागण्याचे प्रमाण वाढते. ही बुरशी खाण्याच्या चवीला खराब करते व त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होऊ लागतो.

हे देखील पहा -

उन्हाळ्यात आपण बरेच वाळवणाचे पदार्थ घरच्या घरी बनवत असतो त्यातील एक लोणची. पावसाळ्यात पाऊस अधिक असल्यास घराबाहेर पडणे आपल्याला शक्य होत नाही. अशावेळी जेवणात पर्यायी म्हणून आपण लोणच्याचा वापर करतो. परंतु, या लोणच्याला बुरशी लागली तर ते खराब होते. या लोणच्याला बुरशी लागल्यानंतर काय करावे हा प्रश्न पडतो त्यासाठी या टिप्स फॉलो करा.

१. आपण लोणचे बनवतो तेव्हा लोणच्याचे सर्व साहित्य चांगले कोरडे करा. हे पदार्थ नीट वाळवले नाहीत तर पावसाळ्यात ओलावा त्यात ओलावा तयार होईल ते खराब होते. पावसाळ्यात ऊन आल्यानंतर लोणच्याला सूर्यप्रकाश दाखवा त्यामुळे त्याला बुरशी लागणार नाही.

२. अनेक वेळा लोणच्यामध्ये बुरशी येण्याचे कारण हे तेल (Oil) आणि मसाल्यांची (Spices) कमतरता. लोणच्यात तेल व्यवस्थित मिसळले नसेल तर लोणच्यामध्ये ओलाव्यामुळे बुरशी येऊ लागते. लोणच्याला बुरशीपासून वाचवण्यासाठी त्यात थोडे तेल आणि मीठ मिसळा. असे केल्याने लवकर बुरशी येत नाही.

३. लोणचे नेहमी काचेच्या बरणीत किंवा पोर्सिलेनच्या बरणीत साठवा. प्लास्टिकच्या डब्यात किंवा भांड्यात साठवू नका. प्लास्टिकच्या भांड्यामध्ये लोणच्याची प्रक्रिया होते त्यामुळे त्याची दुर्गंधी येऊन त्याला बुरशी लागू शकते.

४. लोणचे काढण्यासाठी नेहमी कोरडा चमचा वापरा. लोणच्यामध्ये ओला चमचा कधीही ठेवू नका आणि लोणचे बाहेर काढण्यासाठी ओला चमचा वापरू नका. लोणच्याचे मोठे भांडे वारंवार उघडू नयेत म्हणून लोणच्याचा काही भाग रोजच्या वापरासाठी छोट्या बाटलीत ठेवा. त्यामुळे लोणच्याला बुरशी लागणार नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT