मुंबई : पावसाळ्यात घरातील साफ-सफाई अधिक वाढते. तसेच खाण्यापिण्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावे लागते. वातावरणात गारवा असल्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते.
हे देखील पहा -
पावसाळ्यात (Monsoon) आपल्याला आरोग्याबरोबर (Health) खाण्यापिण्याकडेही अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपण मसाले किंवा लोणची ही उष्ण असणाऱ्या हवामानात ठेवतो परंतु, आपण घरातील खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे चपाती, ब्रेड, चीज, बटर सारख्या पदार्थांमध्ये बुरशी निर्माण होऊ लागते. पावसाच्या ओलाव्यामुळे पदार्थ खराब होतात. पदार्थांना बुरशी लागून किंवा लागल्यास काय करायला हवे हे जाणून घेऊया.
१. चपातीला आर्द्रतेपासून वाचवण्यासाठी आपण सुती कापडाचा वापर करु शकतो. सुती कापड चपातीला ताजे ठेवते व त्याला ओले होऊ देत नाही. त्यामुळे जेव्हाही आपण चपाती बनवतो तेव्हा ती सुती कापडात ठेवा.तसेच चपाती थंड झाल्यानंतर कापडात गुंडाळा.
२. चपातीला बुरशीपासून वाचवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करु शकतो. चपातीवर बुरशी ओलाव्यामुळे येते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत बऱ्याच वेळा रात्रीची चपाती सकाळपर्यंत खराब होते. त्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करा.
३. या ऋतूत हवेत ओलावा असतो त्यामुळे ओलावा नसेल अशा ठिकाणी चपाती साठवण्याचा प्रयत्न करा. चपाती ओल्या जागी ठेवल्यास त्यावर बुरशी येऊ शकते.
४. चपातीला बुरशी लागली असल्यास लाकडी चपातीचा डबा आपण वापरू शकतो. लाकडी डब्यात चपाती ठेवल्याने ती ओली होणार नाही आणि बुरशीही लागणार नाही.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.