Babies constipation SAAM TV
लाईफस्टाईल

Babies constipation: थंडी वाढली की बाळांना का होतं कॉन्स्टिपेशन? तज्ज्ञांनी सांगितली कारणं आणि सोपे उपाय

babies constipation cold weather reasons: हिवाळ्यात अनेक पालकांना बाळांच्या बद्धकोष्ठतेची समस्या जाणवते. तज्ज्ञांच्या मते, थंडीमध्ये शरीरातील बदल आणि आहारातील कमतरता यामुळे बाळांना पचनाच्या समस्या अधिक प्रमाणात होतात.

Surabhi Jayashree Jagdish

हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांप्रमाणेच पोटाचे विकारही मोठ्या प्रमाणात उद्भवतात. बद्धकोष्ठता ही केवळ प्रौढांची समस्या नाही तर लहान बाळांना देखील याचा त्रास होऊ शकतो. या समस्येमध्ये मल कडक होतो त्यामुळे तो शरीराबाहेर टाकण्यात अडचणी निर्माण होतात.

पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनमधील वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता यांनी सांगितलं की, बद्धकोष्ठता झाल्यास बाळाच्या पोटात वेदना होऊ लागतात. यामुळे बाळाला अस्वस्थ वाटू लागतं. बध्दकोष्ठतेच्या लक्षणांमध्ये मल कडक, कोरडं होणं, मल बाहेर पडताना ताण येणं, भूक कमी लागणं, पोट फुगणं, चिडचिड होणं अशी लक्षणं दिसतात. लक्ष न दिल्यास ही स्थिती आणखी गंभीर रुप धारण करू शकते.

हिवाळ्यात का वाढते बद्धकोष्ठतेची समस्या?

  • हिवाळ्यात मुले सामान्यतः कमी प्रमाणात द्रवपदार्थांचं सेवन करतात आणि त्यांना सारखी तहान लागत नाही.

  • थंड तापमानामुळे घरात जास्त वेळ राहिल्याने शारीरिक हालचाली मंदावतात, ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचाल मंदावते.

  • हिवाळ्याच्या दिवसात, विशेषतः शाळेच्या सुट्ट्यांच्यांमध्ये मुलांच्या आहाराच्या सवयी बदलतात, फायबरयुक्त आहाराचे प्रमाण कमी होते तसेच चरबीयुक्त आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन वाढते.

  • कोरड्या हवेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते शकते ज्यामुळे मल कडक होण्याची समस्या उद्भवते.

  • ६ महिन्यांखालील बाळाला केवळ आईचे दूध दिलं जातं त्यामुळे आईने स्वतःच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्यावं आणि हलका आहार घ्यावा

काय कराल उपाय?

  • हिवाळ्यात लहान मुलांमधील बद्धकोष्ठता टाळण्यासाठी मातांनी थोड्या थोड्या अंतराने स्तनपान करावे

  • मुलांना हायड्रेट राहण्यास प्रोत्साहित करा.

  • गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या बाळाच्या पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि आतड्यांसंबंधी हालचाल सुलभ होते.

  • ६ महिने आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. हिरव्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खा. त्याचप्रमाणे फायबरयुक्त फळं खा आणि मुलांच्या आहारात गहू, ओट्स, बाजरी आणि डाळींचा समावेश करा जेणेकरून मल मऊ होईल.

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळा, विशेषतः मैद्याच्या पदार्थांचे सेवन टाळा.

  • लहान बाळाला पोटाची हलकी मालिश केल्याने गॅसची समस्या दूर होण्यास आणि पचनक्रिया सुलभ करण्यास मदत होते. त्यामुळे पोट फुगणं आणि बद्धकोष्ठता कमी होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर बद्धकोष्ठता एका आठवड्यापासून ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ असली तसंच मुलाला मल विसर्जन करताना वेदना किंवा रक्तस्त्राव होत असेल किंवा इतर कोणतीही लक्षणं दिसली असतील तर लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : आयोगाचा भाजपला जोरदार धक्का, ऐन निवडणुकीत परवानगी नाकारली

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹३००० ऐवजी ₹१५०० आले, आता डिसेंबरचा हप्ता का रखडला? महत्त्वाची माहिती समोर

Maharashtra Live News Update: १० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी, माजी आमदार नितीन भोसले यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश

Tilgul Poli Recipe : मकर संक्रांतीला फक्त १० मिनिटांत बनवा मऊसूत 'तीळ गुळाची पोळी', वाचा पारंपरिक रेसिपी

Shubh Shravani Serial : "प्रेम असावं तर असं असावं!"; 'शुभ श्रावणी' मालिकेची रिलीज डेट जाहीर, पाहा खास VIDEO

SCROLL FOR NEXT