Google Alert  Saam tv
लाईफस्टाईल

Google Alert : सावधान! गुगलनं घातली 43 Apps वर बंदी, तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर लगेच डिलीट करा

Why Did Google Remove 43 Apps From Play store : गुगलने आपल्या अधिकृत अॅप स्टोअर म्हणजेच Google Play Store वरून 43 धोकादायक मोबाइल अॅप काढून टाकले आहेत.

कोमल दामुद्रे

Google Play Store Removed 43 Apps : गुगलने आपल्या अधिकृत अॅप स्टोअर म्हणजेच Google Play Store वरून 43 धोकादायक मोबाइल अॅप काढून टाकले आहेत. या अॅप्सवर बंदी घालण्यासोबतच गुगलने यूजर्सना हे अॅप्स काढून टाकण्याचा इशाराही दिला आहे.

गुगलचे म्हणणे आहे की, हे अॅप्स युजर्सच्या फोनची बॅटरी लवकर संपवत आहेत. एवढेच नाही तर यूजर्स फोनची स्क्रीन बंद केल्यानंतरही हे अॅप्स बॅटरी आणि डेटा वापरत आहेत.

1. अॅप काढून टाकण्याचा सल्ला दिला

गुगलने (Google) हे अॅप फोनमधून काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. McAfee च्या सुरक्षा टीमने हे अॅप्स शोधले आहेत. हे अॅप्स वापरकर्त्यांचा डेटा आणि बॅटरीचा वापर अधिक प्रमाणात खराब करत आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, यूजर्सच्या (Users) संमतीशिवाय हे अॅप्स फोनमध्ये सक्रिय होतात आणि बॅकग्राउंडमध्ये काम करतात. त्यानंतर गुगलने या अॅप्सची ओळख करून त्यांना गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे.

2. गुगलने या अॅप्सवर बंदी घातली आहे

टीव्ही/डीएमबी प्लेयर्स, न्यूज आणि म्युझिक डाउनलोडर्ससह कॅलेंडर सारखी अॅप्स सूचीमध्ये आहेत. हे सर्व अॅप्स मीडिया स्ट्रीमिंग होते, जे वापरकर्त्यांना त्यांच्या जाहिराती दाखवून बॅटरी वापरण्यासोबतच इतर डेटा चोरण्याचा प्रयत्न करत होते. तुमच्या डिव्हाइसमध्ये असे कोणतेही अॅप इन्स्टॉल केले असल्यास ते त्वरित काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.

3. हे अॅप्स धोकादायक का होते?

हे 43 Android अॅप्स Google Play Developer Policy चे उल्लंघन करत होते. गुगलच्या म्हणण्यानुसार, डिव्हाइसची स्क्रीन (Screen) बंद असताना अॅप्स जाहिराती लोड करत असल्याचे आढळले. ज्यामुळे फोनची बॅटरी खूप लवकर संपत होती. तसेच, अॅप्सने भरपूर डेटा वापरला. एवढेच नाही तर ते बाहेरच्या माध्यमातून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरण्याचे काम करत होते. अशा स्थितीत बँकिंग फसवणूक होण्याची शक्यताही वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure : घरी बीपी मोजता? हाताची ही एक चूक देऊ शकते चुकीचे रीडिंग

लक्ष्मीपूजनासाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि वस्तूंची यादी

जेवल्यानंतर ढेकर का येतात?

Weather Update: ७ राज्यांत धुव्वाधार पावसाची शक्यता, ५० किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

Firecracker Blast: फटाके फोडताना अनर्थ घडला! मुलानं गमावली हाताची चार बोटं

SCROLL FOR NEXT