झोप ही प्रत्येकाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असते. तुम्ही हे अनुभवलं असेल किंवा पाहिलं असेल की, एखाद्या वेळेस झोप कमी झाली की, येणारा दिवस खूप चिडचिडीत किंवा वादात जातो. हे प्रक्रिया नकळत होते. काहींना हे कमी झोपेमुळे होतं हे लक्षात सुद्धा येत नाही. त्यात साधा सर्दी-खोकला झाला तरी शरीर थकल्यासारखं वाटतं आणि आपण अंगावर घेऊन झोपतो. पण जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल तर त्याला झोप किती महत्वाची आहे हे शब्दात सांगणं कठीण होतं. पुढे आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
झोपे का लागत नाही?
जेव्हा शरीर काम करून, मेंदू विचार करून थकतो तेव्हा त्याला विश्रांतीची गरज असते. पण कॅन्सरच्या रुग्णांनी किंवा उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना झोपेच्या बऱ्याच अडचणी येत असतात. ट्युमरमुळे होणारे शारीरिक बदल, केमोथेरपी, रेडिएशन, औषधांचे दुष्परिणाम आणि मानसिक ताणतणाव यामुळे झोपेची नैसर्गिक असणारी लय बिघडते.
झोप मोड होण्याची कारणे काय?
कॅन्सरमुळे होणाऱ्या वेदना, श्वास घेताना त्रास, खोकला, अंगावर खाज किंवा मूत्राशय व आतड्यांवर पडणारा दाब यामुळे बऱ्याच रुग्णांना झोप लागत नाही. काहींना ताप, खूप थकवा आणि रात्री सतत घाम येत असतो. त्यामुळेही झोप लागत नाही. बऱ्याचदा वातावरणाचा परिणाम होतो. सततचा आवाज, खूप लाईट्स, हॉस्पिटलमधला बेड, तिथल्या खोल्या आणि सतत तपासण्या यामुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही. काहींना कॅन्सर झाल्यामुळे मानसिक धक्का सुद्धा बसतो. या कारणांमुळे झोप लागत नाही.
झोपेवर उपचार काय?
कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार म्हणजे त्यांच्या वेदना कमी करण्यावर नियंत्रण, मळमळ कमी करणं, श्वसनातल्या अडचणी दूर करणं आणि मानसिक आधार देणं हे डॉक्टर करत असतात. औषधांशिवाय झोप सुधारण्यासाठी रिलॅक्सेशन थेरपी आणि योग्य झोपेच्या सवयी फॉलो करण्यावर भर दिला जातो. बऱ्याचदा अशा रुग्णांना शांत आणि अंधुक वातावरण ठेवतात, हलके कपडे देतातस झोपेची वेळ ठरवतात, संध्याकाळी हलकं खायला देतात. याने रुग्णांना वेळेवर झोप येते.
टीप: वरील माहिती केवळ जनजागृतीसाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.