कोणत्या रिलेशनशिपमध्ये भांडणं होत नाहीत? प्रत्येक जोडप्यामध्ये भांडणं ही होतातच. मात्र एखाद्या नात्यामध्ये पुरुष काहीसा टॉक्सिक दिसून येतो, मात्र तरीही महिला त्याच्याकडे आकर्षित होते. अशावेळी हमखास लोकांना पडलेला प्रश्न असतो की, टॉक्सिक पुरुषांकडे महिलांचं आकर्षण का इतकं जास्त असतं?
सामान्यपणे टॉक्सिक पुरुष महिलांना इमोशनली किंवा फिजीकली टॉर्चर करण्याचा धोका असतो. अशीच टॉक्सिक पुरुषांची ओळख असते. अशा लोकांना नात्यांमध्ये तणाव, स्ट्रगल आणि असुरक्षितता असते. महिला अनेकदा याकडे दुर्लक्ष करून शांततेसाठी नात्यात राहतात. मात्र महिला या टॉक्सिक पुरुषांकडे का आकर्षित होतात, याची संभाव्य कारणं जाणून घेऊया.
जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये आत्म-सन्मानाची कमी असते, तेव्हा असं चित्र पाहायला मिळू शकतं. अशा व्यक्ती जेव्हा प्रेमाच्या शोधात असतात तेव्हा पार्टनर त्यांच्या इमोशनल गरजेचा फायदा घेतात. अधिकतर प्रमाणात महिलांच्या बाबतीत ही घटना घडताना दिसते.
एखाद्या महिलेचं फॅमिली बॅकग्राऊंडचा देखील त्या नात्यावर प्रभाव पडतो. जर एखाद्या महिलेचं पालनपोषण चांगलं झालं नसेल, तर त्या महिलेसाठी टॉक्सिक पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये येणं सामान्य गोष्ट असते.
अधिकतर महिला टॉक्सिक पुरुषांच्या मागे आकर्षित असतात याचं कारण म्हणजे, त्यांना असं वाटत असतं की, त्यांचा पार्टनर एका चांगला व्यक्ती बनू शकेल. काळानुसार, आपला पार्टनर बदलेलं अशी त्यांची भावना असते.
ज्या महिला भावनिकरित्या कमजोर असतात त्या टॉक्सिक पुरुषांकडे अधिक आकर्षित होताना दिसतात. अशा महिला इमोशनली दुसऱ्याला दुखावण्यास घाबरतात. त्यामुळे शक्यतो त्या पार्टनर्सच्या सगळ्या गोष्टी ऐकतात.
टीप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.