Heart attack warning signs saam tv
लाईफस्टाईल

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

Heart attack in females: हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. अनेकांना असे वाटते की हृदयविकाराच्या झटक्याचे एकमेव लक्षण म्हणजे छातीत तीव्र वेदना होणे.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय महिलांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय. जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, भारतातील 3 ते 13 टक्के महिलांना कोरोनरी आर्टरी डिजीज आहे. म्हणजेच हृदयात रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये अडथळा निर्माण होतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे प्रमाण वयाच्या गटानुसार वेगवेगळं आहे. पण सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे गेल्या 20 वर्षांत या आजाराचं प्रमाण तब्बल 300 टक्क्यांनी वाढलं आहे.

महिलांना कोणत्या वयात जास्त धोका?

संशोधनानुसार, भारतीय महिलांना हार्ट अटॅक येण्याचं सरासरी वय 59 वर्षं आहे. जे इतर विकसनशील देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेष म्हणजे, हार्ट फेल्युअरचे प्रमाण देखील दुपटीने वाढल्याचं दिसून येतंय. 2000 साली हे प्रमाण 1.1 टक्के होतं, जे 2015 पर्यंत 3.6 टक्क्यांपर्यंत गेलं.

एकंदरीत या आकडेवारी वरून हे स्पष्ट होतं की, महिलांना हृदयाच्या आजारांबाबत अधिक जागरूक होणं, वेळच्यावेळी तपासणी करणं आणि पुरुषांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या लक्षणांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं वेगळी का?

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं ही पुरुषांच्या तुलनेत सौम्य आणि वेगळी असतात. जिथे पुरुषांना छातीत तीव्र वेदना होतात, तिथे महिलांना कंबर, जबड्यांत किंवा पोटात दुखणं असे त्रास जाणवतात. त्याशिवाय श्वास घेण्यास त्रास, अचानक थकवा, मळमळ, चक्कर येणं ही लक्षणं दिसू शकतात. पण ही लक्षणं एखादी सामान्य अॅसिडिटी किंवा मानसिक तणाव समजून दुर्लक्ष केली जातात.

भारतीय समाजात बहुतेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यामुळे आजाराची लक्षणं वेळेवर समजत नाहीत आणि उपचारही उशिरा सुरू होतात. याचा परिणाम असा होतो की, तरुण महिलांमध्ये आणि मेनोपॉजनंतरच्या वयोगटात हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो.

महिलांमध्ये लक्षणं दुर्लक्षित का होतात?

महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं बहुतेकवेळा पुरुषांप्रमाणे दिसत नाहीत, त्यामुळे त्यांना हार्ट अटॅकचं लक्षण नाहीये, असं समजून डॉक्टर किंवा कुटुंबही दुर्लक्ष करतं. जर एखाद्या महिलेला जबड्यात किंवा खांद्यात दुखणं अशा तक्रारी असतील, तर ती घरचं काम करून दमली असेल असं समजलं जातं.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

महिलांमध्ये हार्ट अटॅकची काही लक्षणं अशी असतात की त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं-

  • अचानक आलेला थकवा

  • श्वास घेण्यास अडचण

  • छातीत किंवा पोटात जळजळ

  • झोप न लागणं किंवा अपुरी झोप

  • जबड्यात किंवा पाठीमध्ये दुखणं

  • चालताना दम लागणं

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT