Sleep related habits saam tv
लाईफस्टाईल

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

Circadian Rhythm: दररोज आठ तास झोपूनही थकवा जाणवतोय? झोपेची वेळ अनियमित असल्यास शरीराचे नैसर्गिक घड्याळ बिघडते, हार्मोन्स असंतुलित होतात आणि गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

Sakshi Sunil Jadhav

तुम्हाला माहितच असेल की, प्रत्येक व्यक्तीसाठी दररोज सात ते आठ तासांची झोप गरजेची असते. मात्र फक्त तास मोजून झोप घेणं पुरेसं नाही. झोपेची गुणवत्ता आणि त्याचा ठरलेली वेळसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे रोज आठ तास झोपूनसुद्धा, जर झोपण्याची आणि उठण्याची वेळ सतत बदलत असेल, तर ही सवय आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.

आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असतं, ज्याला सर्केडियन रिदम म्हटलं जातं. हे घड्याळ २४ तासांच्या चक्रावर चालतं आणि सूर्य उगवल्यापासून ते मावळल्यापर्यंत शरीर स्वत:चे चक्र चालू ठेवतं. हेच घड्याळ आपल्या झोपेच्या आणि जागे राहण्याची वेळ, शरीराचे तापमान, हार्मोन्स आणि पचनक्रिया नियंत्रित करतं. जर आपण दररोज एकाच वेळेला झोपलो, तर हे नैसर्गिक घड्याळ संतुलित राहतं आणि शरीर व्यवस्थित कार्य करतं. परंतु, झोपेचा वेळ अनियमित असेल, तर यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

अनियमित झोपेमुळे सर्वात आधी झोपेची गुणवत्ता कमी होते. दिवसाच्या वेळी किंवा वेगवेगळ्या वेळेला झोपल्याने गाढ झोप आणि आरईएम सायकलवर परिणाम होतो. ह्याच टप्प्यांमध्ये शरीराची दुरुस्ती, स्मरणशक्ती साठवणं आणि मानसिक आराम होतो. त्यामुळे आठ तास झोप पूर्ण झाली तरी शरीर ताजेतवाने वाटत नाही.

सर्केडियन रिदम बिघडल्याने मेलाटोनिनसारखा महत्त्वाचा हार्मोन नीट तयार होत नाही. कोर्टिसोल आणि इन्सुलिनवरही नकारात्मक परिणाम होतो. यामुळे ताण वाढतो आणि मेटाबॉलिझम मंदावतो. याचबरोबर घ्रेलिन आणि लेप्टिन या हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने वारंवार भूक लागते. विशेषतः गोड आणि जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे दीर्घकाळात वजन वाढण्यासोबतच टाइप-२ डायबिटीजचा धोका वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज वाढ झाली की घसरण? वाचा तुमच्या शहरातील दर

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात लवकरच होणार वाढ, 'या' महत्त्वाच्या तारखा नोट करा

Real Estate :मुंबईच्या मालमत्ता बाजाराची भरारी! जुलैत 14 वर्षांतील विक्रमी नोंदणी; मुद्रांक शुल्कातून 1,223 कोटींचा महसूल

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

SCROLL FOR NEXT