High blood pressure symptoms saam tv
लाईफस्टाईल

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

WHO Report: भारतामध्ये उच्च रक्तदाबाने २१ कोटींपेक्षा जास्त लोक ग्रस्त आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर असून, WHOने दिलेल्या अहवालानुसार बहुतेक रुग्णांचे ब्लड प्रेशर नियंत्रणात नाही.

Sakshi Sunil Jadhav

बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेकांना ब्लड प्रेशरसारख्या समस्येला सामोरं जावं लागतं. नुकत्याच प्रसारित केलेल्या जागतिक आरोग्य संघटनने (WHO) दिलेल्या रिपोर्टनुसार, भारतातील ब्लड प्रेशरने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या १२ करोडोंवर जाऊन पोहोचली आहे. हा आजार ३० ते ७९ वर्षांमधील व्यक्तींना होत असतो. १२ करोडोंचा हा आकडा जागतिक पातळीपेक्षा सरासरी ३४ टक्क्यांहून कमी आहे. नुकत्या केलेल्या चाचणीनुसार भारतातील १७.३ करोडोंहून अधिक लोक हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त आहेत.

रिपोर्टनुसार ३० ते ७९ या वयातील लोक हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त आहेत. हा आकडा अतिशय चिंताजनक आहे. कारण हा आकडा देशातल्या लोकसंख्येच्या जवळ जाणारा आहे. भारतात साधारण ३९ टक्के लोकांनाच या आजाराबद्दल माहिती आहे. तर ८३ टक्के व्यक्तींचे बल्ड प्रेशर अनियंत्रित आहे. याची माहिती ब्लड प्रेशरचे तज्ज्ञ, बांग्लादेश, फिलीपिन्स आणि दक्षिण कोरियातील तज्ज्ञ, तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख डॉक्टरांनी दिली आहे.

जून २०२५ मध्ये भारतात आरोग्य मंत्रायला द्वारे ३० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांसाठी देशवापी तपासणी आणि उपचार मोहीम राबवण्यात आले. तेव्हा केलेल्या चाचणीनुसार १.११ करोडपेक्षा जास्त लोक ब्लड प्रेशरने ग्रस्त आहे. यामध्ये ६४ लाख लोकांना डायबिटीजचे निदान झाल्याचे कळाले. अशा रुग्णांवर त्वरित उपचार सुद्धा करण्यात आले. त्याने अनेक रुग्णांना या आजारापासून मुक्त होता आले.

WHOने राबवलेल्या या अभियानाचा उद्देश ३० वर्ष आणि त्याहून जास्त वय असलेल्या रुग्णांना त्वरित आजारातून मुक्त करणे हा होता. तसेच त्यामध्ये या वयोगटातील व्यक्तींची non-communicable diseases चाचणी करणे हा सुद्धा उद्देश होता. तर पाकिस्तान, भुतान, श्रीलंका, नेपाळ ही राष्ट्रे सुद्धा उच्च रक्तदाबाचा सामना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT