What is Monkeypox, monkey pox symptoms ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्सचा धोका सर्वाधिक कोणाला? नवजात बाळाला की, वयोवृध्दांना जाणून घ्या

सध्या जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्स या आजाराने सर्वांची चिंता वाढवली आहे.

कोमल दामुद्रे

मुंबई : मागील दोन वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. अद्यापही कोरोनाचे रुग्ण जगभरात काही प्रमाणात सापडत आहे. त्यातच पुन्हा एकदा मंकीपॉक्सने देखील आपले डोकेवर काढण्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखील पहा -

सध्या जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्स या आजाराने सर्वांची चिंता वाढवली आहे. हा आजार अतिशय दुर्मिळ आहे. जो प्राण्यांपासून मनुष्यामध्ये पसरु शकतो. यामध्ये त्वचेचे संक्रमण, न्यूमोनिया व डोळ्यांच्या समस्या अधिक तर पाहायला मिळतील. कांजण्या व मंकीपॉक्सची लक्षणे सारखी दिसतात परंतु, नेमके काय झाले आहे हे समाजयला वेळ लागतो.

याचा सर्वाधिक धोका कोणाला?

मंकीपॉक्स हा एखाद्या संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याच्या मार्फत आपल्याला होऊ शकतो. याच्या संपर्कात आल्याने, त्वचा, तोंड किंवा लैंगिक संपर्काद्वारे हा मानवांमध्ये पसरु शकतो. मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीशी किंवा लैंगिक संबंध ठेवलेल्या लोकांनी या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य उपायोजना करायला हव्यात. तसेच प्राण्यांच्या नियमित संपर्कात आपण येत असू तर स्वत: चे संरक्षण कसे करता येईल हे पहा.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हा आजार नवजात बाळ, लहान मुले, वयोवृध्द व रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांमध्ये यांचा धोका सर्वाधिक आढळून येऊ शकतो. ज्यावेळी आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते किंवा ती व्यवस्थितरित्या काम करत नाही त्यावेळी आपल्याला अनेक आजार (Disease) संक्रमण होऊ शकतात. ही लक्षणे इतर आजारांच्या तुलनेत सारखी दिसत असल्याने आपल्याला त्याचे लवकर निदान कळत नाही. त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope: 'या' राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, पैशाची चणचण भासणारच नाही; वाचा तुमचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

SCROLL FOR NEXT