White Shoes Cleaning Hacks Saam tv
लाईफस्टाईल

White Shoes Cleaning Hacks : मिनिटात स्वच्छ होतील व्हाइट शूज, साफ करण्यासाठी या सोप्या टीप्स फॉलो करा

White Shoes Look New Again : व्हाइट शूजवर काळे डाग आणि घाण सहज साचते. साफ करता आपल्या नाकी नऊ येतात. त्यामुळे शूज घाण दिसतात.

कोमल दामुद्रे

Cleaning Hacks Tips :

हिवाळ्यात अनेकांना शूज घालण्याची हौस असते. त्यात आजकाल व्हाइट शूज घालण्याची क्रेझ वाढली आहे. व्हाइट शूजमुळे लुकमध्ये वाढ होते. पण हे शूज लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते.

व्हाइट शूजवर काळे डाग आणि घाण सहज साचते. साफ करता आपल्या नाकी नऊ येतात. त्यामुळे शूज घाण दिसतात. शूजवरील घाण सहज साफ होत असले तरी तेलाचे डाग किंवा काळे डाग सहज जात नाही. पण काही सोप्या टीप्स वापरल्या तर मिनिटात स्वच्छ होतील. व्हाइट शूज स्वच्छ करण्यासाठी कोणत्या तीन गोष्टींचा वापर करावा जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा स्वयंपाकघरात (Kitchen) उपयोगी पडत नाही तर शूज साफ करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. पाणी आणि बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करुन शूजवर लावा. ५ ते ६ तासानंतर शूज स्वच्छ पुसून घ्या. शूज काही मिनिटात नव्यासारखे चमकतील.

2. व्हिनेगर

व्हिनेगरच्या मदतीने व्हाइट शूज स्वच्छ करु शकता. यासाठी बादलीत व्हिनेगर घालून त्यात कोमट पाणी घाला. त्या पाण्यात (Water) काही वेळ शूज भिजत ठेवा. काही वेळाने शूज पुन्हा नव्यासारखे होतील.

3. टूथपेस्ट

व्हाइट शूजवरील डाग सहसा निघत नाही. अशावेळी टूथपेस्टचा वापर करु शकता. टूथपेस्टच्या मदतीने तुम्ही शूजवरील डाग सहज काढू शकता. ब्रशवर टूथपेस्ट घेऊन शूजवरील डागावर लावा आणि घासा. शूज स्वच्छ (Clean) होण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वे विस्कळीत प्रवाशांची मोठी गर्दी

Raghav Chadha: राघव चढ्ढांवर 'आप'ची कारवाई, मेहुण्याच्या पाठीशी उभी राहिली प्रियांका, 'देसी गर्ल'नं केली खास पोस्ट; म्हणाली...

Ranbir Kapoor-Ramayana : 'रामायण'मध्ये रणबीर कपूरचा डबल धमाका; प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता, स्वतः दिली कबुली

मोठी बातमी! आधी बायको आता भोंदू बाबाचा मुलगाही फरार; हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Onoin- Garlic Hair Oil: काळेभोर लांब केसांसाठी 'कांदा- लसूण' तेल ठरेल फायदेशीर, बनवण्याची पद्धत आहे सोपी

SCROLL FOR NEXT