Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : वयोमानाच्या आधी तुमचे केस पांढरे होताय ? नारळाच्या तेलासोबत वापरा 'हे' पदार्थ, होतील लांब व काळे

केस पांढरे झाल्यानंतर आपण इतर अनेक केमिक्ल उत्पादनांचा वापर करु लागतो.

कोमल दामुद्रे

Hair Care Tips : लहान वयात तुमचे केस पांढरे होताय का ? हल्ली ही समस्या तरुणापेक्षा लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. यामुळे मुलांचा आत्मविश्वास अधिक कमजोर होऊ लागतो.

केस (Hair) पांढरे होणे हे खरेतर आजाराचे लक्षण मानले जाते. खाण्यापिण्यातील बदलामुळे किंवा बदलेल्या जीवनशैलीमुळे केस पांढरे होऊ लागतात. केस पांढरे झाल्यानंतर आपण इतर अनेक केमिक्ल उत्पादनांचा वापर करु लागतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या वाढणारे केस व त्याच्या रंगाना हानी पोहोचते.

केस पांढरे होणे हे काही वेळा अनुवंशिक असते तर काही वेळा ते बदलेल्या जीवनशैलीमुळे होते. काही लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे केस पांढरेही होतात.

जर काही सोप्या व घरगुती वापराचा अवलंब केल्यास आपले केस नैसर्गिकरित्या कोरड्या व निर्जिव केसांना पुनरुज्जीवित करण्यास मदत होईल. तसेच, खुंटलेल्या केसांची वाढ देखील होईल. त्यासाठी काही घरगुती उपाय करुन पहा

१. खोबरेल तेल आणि मेहंदी

पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. असे असले तरी खोबरेल तेल केसांसाठी खूप उपयुक्त मानलं जातं आणि मेहंदी हे केसांना नैसर्गिक रंग देण्याचं कामही करते. केस नैसर्गिकरीत्या काळे करण्यासाठी प्रथम मेहंदीची पाने उन्हात वाळवा. ४ ते ५ चमचे खोबरेल तेल (Oil) गरम करा आणि या उकळत्या तेलात कोरडी पाने घाला. तेलाला रंग आला की गॅस बंद करा. तेल काही वेळ थंड होण्यासाठी राहू द्या आणि कोमट तेल केसांना मुळापासून लावा. हे मिश्रण अर्धा तास राहू द्या आणि अर्ध्या तासाने स्वच्छ पाण्याने केस धुवा. असे नियमित केल्याने केसांना नैसर्गिक रंगाप्रमाणे चमक मिळेल.

२. खोबरेल तेल आणि आवळा

आवळ्यात अनेक पोषक घटक असतात. आवळा हा आयुर्वेदात अमृत मानला जातो. आवळा आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. त्यात कोलेजन वाढवण्याची ताकद असते. आवळ्यामध्ये केवळ जीवनसत्त्व क च तर त्यात लोह देखील आढळते, जे केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

हा उपाय करण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळा. हे मिश्रण गरम करून थंड होऊ द्या आणि टाळूवर मसाज करा व केसांना देखील लावा. हे मिश्रण रात्री लावल्यानंतर सकाळी स्वच्छ पाण्याने केस धुवा. या उपायाचा प्रभाव काही दिवसातच तुमच्या केसांवर दिसून येईल आणि तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे दिसू लागतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फ्लॅट देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींना लुटलं, मुंबईतील बड्या बिल्डरचा कारनामा उघड

Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

KL Rahul: 358 रन्स करूनही भारताच्या पदरी पराभवच; 'या' खेळाडूंवर केएल राहुलने फोडलं खापर, म्हणाला, मी स्वतःला दोष देतोय कारण...!

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT