Best Vitamins For Hair Loss: केसगळती होतेय? या जीवनसत्त्वांचा आहारात समावेश करा, होईल केसगळती बंद

Best Vitamins For Hair Loss : तरूण वयातच केस गळती होत असेल तर याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
Best Vitamins For Hair Loss
Best Vitamins For Hair LossSaam Tv

Best Vitamins for hair loss: अनेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. जेव्हा केस गळायला सुरूवात होते. त्यावेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण जर तरूण वयातच केस गळती होत असेल तर याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. (Hair Care Tips In Marathi)

तुटणारे, कोरडे, गळणारे केस अशा प्रकारच्या सर्व केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या आहारात बदल करावा लागेल. आपल्या शरीराला हवे असणारे पोषक घटक खावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे.‌

Best Vitamins For Hair Loss
Weight Loss Recipe : वेट लॉस करताय? ब्रोकोलीपासून बनवा डिलिशियस स्नॅक्स

सप्लिमेंटमध्ये वैज्ञानिकरित्या संशोधन केल्यानंतर यात विविध प्रकारचे जीवनसत्त्व, खनिजे आणि इतर घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. स्त्रियांना दिवसभरासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची पोषक तत्वे यातून मिळतील. चला तर मग सविस्तर जाणुन घेऊया.

१. बायोटिन (Biotin)-

बायोटिन म्हणजेच व्हिटॅमिन बी ७ हे आपल्या शरीरातील पेशींसाठी खूप महत्वाचे आहे. बायोटिनच्या कमतरतेमुळे केस गळणे, त्वचेवर पुरळ आणि नखे ठिसूळ होणे ही कारणे आपल्या शरीरात बायोटिनची कमतरता असू शकतात. या गोळ्या नियमिपणे घेतल्याने मेटॅबोलिझमही वाढतो. त्यामुळे निरुत्साही, थकल्यासारखे वाटणे कमी होते, पचनक्रिया सुधारते त्यामुळे उत्साही आणि आनंदी वाटू लागते.

रोजच्या आहारातून आवश्यक असलेले बायोटिन मिळते. तसेच, जर तुमच्या आहारात बायोटिनची कमतरता असेल तर आपण या पदार्थांचे सेवन करावे.

- अंड्याचा बलक

- मांस

२. लोह (Iron) -

रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी लाल रक्तपेशींना लोहाची आवश्यकता असते. लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. थकवा, त्वचा पिवळी पडणे आणि केस गळणे ही त्याची लक्षणे आहेत.

या कारणांमुळे लोहाची कमतरता निर्माण होते -

- महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान जोरदार रक्तस्त्राव

- काही जुन्या आजाराने त्रस्त असाल (Chronic Disease)

- शाकाहारी असाल तर

या पदार्थांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते

- लाल मांस

- हिरव्या पालेभाज्या

- शेंगा

३. जीवनसत्व क -

आतड्यांमध्ये लोह शोषण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक आहे. ज्यावेळी आपण लोहयुक्त आहार घेत असाल, त्याच वेळी जीवनसत्व क चे सेवन केल्याने अन्नातील लोह शोषण्यास मदत होईल. खाली जीवनसत्व क च्या काही स्त्रोतांची नावे आहेत -

- आंबट फळे

- पालेभाज्या

- सिमला मिर्ची

Best Vitamins For Hair Loss
Benefits Of Oats : सकाळच्या नाश्त्यात बनवा ओट्सपासून खीर, आरोग्याला होतील अनेक फायदे

४. जीवनसत्व ड -

आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचे आहे. जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे केस गळण्याची आणि हाडे कमकुवत होण्याची शक्यता आसते. जेव्हा आपण उन्हात बाहेर जातो तेव्हा आपल्या त्वचेला जीवनसत्व ड आवश्यक असते, परंतु आपल्यापैकी अनेकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही

फॅटी फिश खाऊन आणि फोर्टिफाइड दूध पिऊन आपण जीवनसत्व ड ची कमतरता पूर्ण करू शकता. याशिवाय आपण डॉक्टरांना जीवनसत्व ड च्या सप्लिमेंट्ससाठी देखील सांगू शकतो. जीवनसत्व ड सह मॅग्नेशियमचे सेवन अधिक फायदे आणेल.

झिंक (Zinc) -

केस आणि इतर पेशींमध्ये प्रथिने तयार करण्यात झिंक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आपले शरीर झिंक तयार करत नाही, आपल्याला आपल्या अन्नातून आणि पूरक पदार्थांमधून झिंकचा पुरवठा करावा लागतो. झिंकच्या कमतरतेमुळे केस गळणे, जखमा भरण्यास उशीर होणे, तसेच वास आणि चव कमी होऊ शकते.

तुम्हाला झिंकच्या कमतरतेचा धोका असू शकतो जर -

- तुम्ही गर्भवती असाल किंवा बाळाला दूध पाजत असाल.

- आतड्यांसंबंधी समस्या किंवा तीव्र अतिसार झाला असेल.

- किडनीचा त्रास असेल.

खालील पदार्थांचे सेवन करून झिंकचा पुरवठा करता येतो

- मांस

- शेंगा

- शेंगदाणे आणि बिया

केस गळत असतील तर जितक्या लवकर तुम्ही ही समस्या गांभीर्याने घ्याल तितके आपले टक्कल पडण्यापासून वाचू शकाल. शक्य तितक्या लवकर आपल्या डॉक्टरांना भेट द्या आणि शरीरातील कोणत्याही पौष्टिकतेची कमतरता भरून काढा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com