Benefits Of Oats : सकाळच्या नाश्त्यात बनवा ओट्सपासून खीर, आरोग्याला होतील अनेक फायदे

ओट्सचा शरीराला फायदा कसा होतो हे जाणून घ्या.
Benefits Of Oats
Benefits Of OatsSaam Tv
Published On

Benefits Of Oats : दिवसाची सुरुवात आपण आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करुन करायला हवे. त्यासाठी आपल्याला वेळोवेळी याविषयी सांगितले जाते.

डॉक्टर आणि फिट्नेस तज्ज्ञ आपल्याला सकाळच्या नाश्त्यात ओट्स खायला सांगतात. परंतु, त्याची चव ही कोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही. विशेषत: मुले. पण हे देखील खरे आहे की ओट्समध्ये अनेक पौष्टिक मूल्ये आहेत, जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

यासाठी आपण ओट्सपासून गोडाचे पदार्थ किंवा मिठाई बनवू शकतो. यासाठी आपण ओट्सची खीर बनवू शकतो. ओट्स खीरची ही आरोग्यदायी आणि अतिशय चविष्ट रेसिपी आहे.

ओट्स आणि ड्रायफ्रुट्स घालून बनवलेली खीर छान लागते. हे बनवायला खूप सोपे आहे आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष पदार्थांची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया ओट्स खीरची रेसिपी.

Benefits Of Oats
Festival Special : तुपाशिवाय बनवा मखान्यापासून चविष्ट रेसिपी, तोंडात टाकताच विरघळेल

ओट्स खीर बनवण्यासाठी साहित्य -

ओट्स - १ कप

दूध - १/२ लिटर

साखर (Sugar) - आवश्यकतेनुसार

खजूर - ४ ते ५

बदाम - ६ ते ७

वेलची - २

केळी - १

मनुके - ६ ते ७

कृती -

Oats Kheer
Oats KheerCanva

१. ओट्स ४ ते ५ मिनिटे भाजून घ्या.

२. एका पॅनमध्ये दूध (Milk), साखर, वेलची, खजूर, बदाम आणि मनुका घाला. सुमारे ५ मिनिटे उकळवा.

३. त्यात ओट्स घाला आणि ते घट्ट होईपर्यंत उकळू द्या.

४. खीर शिजली की तुम्हाला हवे असल्यास फळे घाला आणि गरम किंवा थंड सर्व्ह करा.

ओट्सचे शरीरासाठी कसे फायदे आहेत ते जाणून घेऊया

१. पचनसंस्थेसाठी फायदेशीर

ओट्स आपल्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर असतात. यामध्ये फायबर असते ज्यामुळे आतडे स्वच्छ होतात. एवढेच नाही तर फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

२. प्रतिकारशक्ती वाढवणे

ओट्समध्ये विरघळणारे फायबर आणि बीटा-ग्लुकन असतात. जे पांढऱ्या रक्त पेशी (WBC) मजबूत करण्यास मदत करते. बीटा-ग्लुकन WBCs ला उत्तेजित करते आणि त्यांना संसर्गाशी लढण्यास मदत करते.

३. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरही भरपूर आहे. हे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढून हृदयाचे आरोग्य सुधारतात. ओट्स ब्लॉटिंग पेपर म्हणून काम करतात कारण ते कोलेस्ट्रॉल शोषून घेतात आणि ते कमी करण्यास मदत करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com