White Bread Side Effects
White Bread Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

White Bread Side Effects : व्हाईट ब्रेडचे सेवन करताय तर वेळीच व्हा सावध ! अन्यथा होऊ शकतात 'हे' आजार

कोमल दामुद्रे

White Bread Side Effects : सकाळच्या नाश्त्यासाठी पर्यायी पदार्थ जर कोणता असेल तर, तो ब्रे़ड. हल्ली ब्रेडपासून नाश्त्यात नवनवीन पदार्थ बनवले जातात. सॅण्डविच, ब्रे़ड बटर, टोस्ट असे विविध पदार्थ खाल्ले जातात.

खरं तर, जर तुम्हाला ब्रेड खायचा असेल किंवा त्यापासून डिश बनवायची असेल, तर खूप कमी वेळात तुम्ही ब्रेडचा नाश्ता तयार करू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का व्हाईट ब्रेड आरोग्यासाठी (Health) किती हानिकारक आहे.

व्हाईट ब्रेडचे सतत सेवन केल्याने तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. हे बनवण्यासाठी मुख्यतः मैदा वापरला जातो. अशा परिस्थितीत ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया, व्हाईट ब्रेड खाल्ल्याने शरीराला नुकसान कसे होते ? (Latest Marathi News)

1. वजन वाढण्याची समस्या

पांढऱ्या ब्रेडचे नियमित सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. त्यात रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात चरबीच्या रूपात साठवले जाते, ते खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते.

2. रक्ततातील साखरेची (Sugar) पातळी वाढण्याची शक्यता

जर तुम्ही व्हाईट ब्रेड जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीरातील रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही पांढर्‍या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खाऊ शकता.

3. बद्धकोष्ठतेची समस्या

रोज ब्रेडचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. या ब्रेडमध्ये ग्लूटेन जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे यकृत खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर तुम्हाला पोटदुखी, जुलाब इत्यादी अनेक समस्या होऊ शकतात.

4. मानसिक आरोग्यावर परिणाम होतो

संशोधनानुसार, परिष्कृत कार्बयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये नैराश्यासारख्या समस्या अधिक आढळतात. अशा परिस्थितीत व्हाईट ब्रेड खाणे टाळावे.

5. हृदयरोग

जर तुम्ही रोज व्हाईट ब्रेडचे सेवन केले तर ते तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार देखील होऊ शकतात. ते खाल्ल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही ही ब्रेड जास्त वेळ खात असाल तर तुम्हाला हृदयविकाराचाही बळी होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

Today's Marathi News Live : मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

SCROLL FOR NEXT