Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे? कपलने 'ही' चूक करूच नये; पाहा शास्त्र काय सांगतं?

Husband Wife sleeping side: वास्तूशास्त्रानुसार याची दखल घेणं गरजेचं आहे. जर वास्तूच्या या नियमांचं पालन केलं तर घरात सकारात्मकता आहे. प्रत्येक कामात यश मिळते.

Surabhi Jayashree Jagdish

वास्तू शास्त्राच्या नियमांनुसार, काही गोष्टींचं पालन करणं फार गरजेचं असतं. पती-पत्नी नेहमी एकत्र झोपतात मात्र त्यांच्या झोपण्याची स्थितीही महत्त्वाची असते. वास्तूशास्त्रानुसार याची दखल घेणं गरजेचं आहे. जर वास्तूच्या या नियमांचं पालन केलं तर घरात सकारात्मकता आहे. प्रत्येक कामात यश मिळते.

पती-पत्नीसाठी खास नियम

वास्तुशास्त्रात पती-पत्नीसाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्यांचं पालन केल्याने त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकतं. पती-पत्नीमधील नातं अधिक घट्ट होतं. यासाठी वास्तुमध्ये खास नमूद करण्यात आलं आहे की, पतीने पत्नीने कोणत्या बाजूला झोपावं.

पत्नीने कोणत्या बाजूला झोपावं?

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे. पत्नीने पतीच्या डाव्या कुशीवर झोपणं शुभ मानलं जातं. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहण्यास मदत होते, असं मानलं जातं. त्याचप्रमाणे समृद्धी आणि संपन्नताही वाढते. पतीच्या दीर्घायुष्यासाठीही हे महत्त्वाचं असल्याचं मानलं जातं.

पौराणिक कथा काय सांगते?

पौराणिक कथेनुसार, ज्यावेळी भगवान शिव यांनी अर्धनारीश्वराचं रूप धारण केले तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूने स्त्री तत्व म्हणजेच माता पार्वती प्रकट झाली होती. यामुळेच हिंदू धर्मात पत्नीला वामांगी म्हणतात. म्हणजे डाव्या बाजूचा अधिकारी. म्हणूनच लग्नानंतर, प्रत्येक शुभ कार्यात पत्नी पतीच्या डाव्या बाजूला बसते.

या गोष्टींची अवश्य घ्याल काळजी

  • वास्तुशास्त्रानुसार, पती-पत्नीची खोली दक्षिणेकडे असणं गरजेचं आहे. यामुळे वैवाहिक जीवनात नेहमी आनंद राहतो.

  • तुमच्या खोलीत असलेला बेड लाकडाचा असावा आणि चांगल्या स्थितीत असावा. तुटलेल्या पलंगावर कधीही झोपू नका. यामुळे आयुष्यात नकारात्मकता येते.

  • बेडरूममध्ये झाडू, कचराकुंडी किंवा कचरा ठेवू नका.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भारतीय टेनिसपटूची राहत्या घरात हत्या, जन्मदात्या वडिलांनीच गोळ्या झाडून पोटच्या पोरीला संपवलं

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये १० वर्षीय मुलानं पळवली सव्वा लाख रुपय असलेली बॅग

Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार; कॅनडामध्ये ३ दिवसांपूर्वी झाली कॅफेची ओपनिंग

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! जमिनीच्या क्षुल्लक वादातून तरुणाच्या डोक्यात वार, गावच्या माजी सरपंचाचा कारनामा

Sev Puri green spicy chutney: स्ट्रीट स्टाईल शेवपुरीची हिरवी चटणी आता बनवा घरच्या घरी, पाहा रेसिपी

SCROLL FOR NEXT