healthy food for children google
लाईफस्टाईल

Summer Health Tips: वातावरण बदललं, मुलांची तब्येत सांभाळा ! आजारपण टाळण्यासाठी द्या 'हा' विशेष आहार

Summer diet for kids: वाढत्या उन्हात मुलांच्या शरीरावर अनेक परिणाम होत असतात. त्यामध्ये लहान मुलांच्या आहाराची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्यांना योग्य आहार दिला तरचं ते चांगलं आणि हेल्दी जीवन जगता येईल.

Saam Tv

सध्या उन्हाळा वाढतच चालला आहे. वातावरणाच्या या बदलामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम होत आहे. लहान मुलांच्या रोगप्रतिकार शक्ती कमजोर होत आहे. त्याने लहान मुलांना सतत सर्दी-खोकला, ताप, तसेच पचनासंबंधीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अशातच पालकांनी मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. याबद्दल आपण कोणते उपाय केले पाहिजेत हे आपण जाणून घेणार आहोत.

शिळे अन्न

बदलत्या वातावरणात लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती त्यांनी शिळे अन्न खाणे टाळले पाहिजे. लहान मुलं बाहेरचं खाणं जास्त पसंत करतात. पण ते शिळं असतं. त्यामुळे त्यांच्या पोटाच्या समस्या वाढू शकतात. तसचे लहान मुलांना गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, जास्त थंड पेय, डेअरी प्रोडक्ट्स देणं टाळलं पाहिजे. लहान मुलांना नेहमीच ताजं आणि हलकं अन्न दिलं पाहिजे. तर आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे.

थंड आणि फ्रिजमधील पदार्ख

लहान मुलं उन्हाळ्यात थंड पदार्थ खाणं पसंत करतात. पण त्याचं प्रमाण पालकांनी ठरवलं पाहिजे. थंड पाणी, कोल्डड्रिंक किंवा फ्रिजमध्ये ठेवलेली फळं लहान मुलांना देणं टाळावं. या पदार्थांचं सेवन केल्याने मुलांना खशात खवखव, सर्दी, खोकला अशा आजारांना सामोरं जावं लागू शकतं.

गोड पदार्थांचे सेवन

पालकांना बऱ्याचदा सवय झालेली असते की, लहान मुल रडायला लागलं तर त्यांना लगेच चॉकलेट किंवा रंगीबेरंगी लॉलीपॉप द्यायचं. पण मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. हे पदार्थ मुलांना कमकुवत करतात. त्याने मुलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

तळलेले पदार्थ

लहान मुलांना कुरकुरे, वेफर्स, पॅकेज फुड्स खायला प्रचंड आवडतात. मात्र त्याने मुलांची पचनक्रिया योग्यरित्या होत नाही. याने मुलांना फुड पॉयजन होण्याची शक्यता असते. तसेच गॅस, अ‍ॅसिडीटी आणि डायरिया या आजारांना सुद्धा सामोरं जावं लागतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT