immune boosting foods google
लाईफस्टाईल

Digestive Care : दैनंदिन आहारात दही-ताक कधी घ्यावं? तज्ज्ञांचा हा सल्ला नक्की वाचा

Health Tips : दही आणि ताक या दोन्हींचे आरोग्यदायी फायदे आहेत. दही हाडे व रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त तर ताक पचन सुधारते, शरीराला थंडावा देते व वजन कमी करण्यास मदत करते.

Sakshi Sunil Jadhav

  1. दही हाडे व दात मजबूत करण्यासाठी उपयुक्त.

  2. ताक पचन सुधारते व शरीराला थंडावा देते.

  3. दही रोगप्रतिकारशक्ती व वजन वाढवण्यासाठी फायदेशीर.

  4. ताक वजन कमी करण्यासाठी आणि निर्जलीकरण रोखण्यासाठी उत्तम.

भारतात कोणताही ऋतू असला तर स्वयंपाकघरात ताक किंवा दही असतेच. या दोन पदार्थांना कायम विशेष स्थान मिळालेले आहे. चवने आणि गुणधर्म या दृष्टीने हे दोन्ही वेगळे पदार्थ असले तरी आरोग्यासाठी त्यांचं महत्व तितकेच मोठे आहे. अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की दही जास्त चांगले की ताक? याचे उत्तर त्यांच्या फायद्यात दडलेले असते. पुढे आपण त्याबद्दल सोप्या शब्दात आणि तज्त्रांच्या सल्ल्यानुसार माहीती जाणून घेऊ.

दह्याचे फायदे

दुधाला आंबवून तयार केलेलं दही फक्त चविष्टच नसून त्यात कॅल्शियम, प्रथिने आणि प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक हाडं व दात मजबूत करतात, पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ घडवून पचन सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात. नियमित दही सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन वाढवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे.

ताकाचे फायदे

दुसरीकडे, दही फेटून पाणी मिसळून तयार केलेलं ताक हलकं, पचायला सोपं आणि शरीराला थंडावा देणारं असतं. ताकामधील लॅक्टिक अॅसिड पचन सुधारतं. तसेच गॅस आणि अॅसिडिटीपासून दिलासा मिळतो. निर्जलीकरण रोखून शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखण्यात ताक महत्त्वाची भूमिका बजावतं. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ताक एक उत्तम पर्याय मानला जातो.

कारण ते कमी कॅलरीजचं असतं. त्यात मसाले जसे की भाजलेले जिरे किंवा काळं मीठ घातल्यास त्याची चव आणि फायदे आणखी वाढतात. शेवटी, दही आणि ताक दोन्हीही शरीरासाठी उपयुक्त आहेत. मात्र त्यांचा वापर गरज, आहार आणि ऋतूनुसार बदलतो. मजबूत हाडे आणि प्रतिकारशक्ती हवी असेल तर दही उत्तम ठरते. तर हलकं, थंडगार आणि पचायला सोपं काही हवं असेल तर ताक अधिक योग्य ठरते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीनुसार आणि आरोग्याच्या गरजेनुसार या दोन्ही पदार्थांची योग्य निवड करणेच शहाणपणाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Crime : वडिलांनी घेतलेल्या कर्जातून त्रस्त मुलाने जन्मदात्या आईचा घेतला जीव; रक्ताच्या थारोळ्यात आईला पाहून आत्महत्येचा प्रयत्न

Sambhajinagar: आधी पेट्रोल ओतलं नंतर पेटवून दिलं, माथेफिरूचा पेट्रोल पंपाला आग लावण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बायपास बॉर्डरवरच गेवराई पोलिसांनी रोखलं

Gold Silver Price : गणेश चतुर्थीआधी ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका, सोनेचांदीचा भाव लाखाच्या पार

Ganesh Chaturthi 2025 : गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंत पाळा हे नियम; मिळेल भरपूर लाभ

SCROLL FOR NEXT