Winter Season Diet Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Season Diet: हिवाळ्यात ही फळं खाणं आत्ताच टाळा, अन्यथा गंभीर समस्यांना जावं लागेल सामोरं, वाचा संपूर्ण यादी

Cold Health Tips: हिवाळ्यात काही फळं शरीराला थंडावा देतात आणि त्यामुळे सर्दी, खोकला किंवा कफ वाढू शकतो. जाणून घ्या कोणती फळं या हंगामात टाळावीत आणि कोणती खावीत.

Sakshi Sunil Jadhav

हिवाळ्यात थंड फळं शरीराचं तापमान कमी करून आजार वाढवू शकतात.

काकडी, टरबूज, नारळ पाणी आणि स्ट्रॉबेरी टाळणं फायदेशीर.

सफरचंद, पेरू, संत्रं आणि केळं ही हिवाळ्यासाठी योग्य फळं.

आहार निवडताना ऋतूनुसार फळं निवडल्यास रोगप्रतिकारक शक्ती टिकवता येते.

नुकताच पावसाळा ऋतू परतून हिवाळ्याचे आगमन होत आहे. हिवाळा सुरू होताच शरीरावर थंडीचा परिणाम जाणवू लागतो. या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा अशा समस्या वाढतात. त्यामुळे या हंगामात आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. अनेकदा आपण सर्व ऋतूंमध्ये तेच फळ खातो, मात्र काही फळं अशी असतात जी उन्हाळ्यात फायदेशीर असली तरी हिवाळ्यात ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

हिवाळ्यात टाळावीत अशी फळं कोणती?

काकडी आणि टरबूज

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी काकडी आणि टरबूज हिवाळ्यात नुकसान पोहोचवू शकते. ही फळं शरीराचं तापमान कमी करतात. त्यामुळे सर्दी, खोकला आणि कफ वाढतो. ज्या लोकांना आधीच सर्दी-खोकल्या आहे त्यांनी या फळांपासून दूर राहणं गरजेचं आहे.

नारळ पाणी

नारळ पाणी पौष्टिक असलं तरी त्याचा थंडावा हिवाळ्यात शरीरावर प्रतिकूल परिणाम करू शकतो. याचं जास्त सेवन केल्याने कफ वाढतो आणि छातीत जडपणा, खोकला किंवा श्वास घेण्याच्या समस्या वाढतात.

द्राक्षे

द्राक्षे चविष्ट असतात. पण हिवाळ्यात त्याचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं. द्राक्षांची थंड प्रवृत्ती गळा खवखवणे आणि कफ वाढवू शकते. जर तुम्हाला आधीपासून सर्दी-खोकल्याचा त्रास असेल, तर या फळाचं सेवन टाळणं चांगलं.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये थंडावा देणारे घटक असतात. त्यामुळे हिवाळ्यात ही फळं खाल्ल्याने कफ आणि गळ्याची समस्या वाढू शकते. ज्यांना एलर्जी, खोकला किंवा घशात खवखव आहे, त्यांनी स्ट्रॉबेरी टाळावी.

अवोकाडो

अवोकाडोमध्ये हेल्दी फॅट असतं, पण त्यातील हिस्टामाइन घटक काही लोकांमध्ये अॅलर्जी वाढवतो आणि खोकला, छातीतील जडपणा वाढवू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात याचं सेवन मर्यादित प्रमाणात करणं योग्य आहे. तुम्ही हिवाळ्यात सफरचंद, पेरू, संत्रं आणि केळं ही फळं सर्वोत्तम मानली जातात. ही फळं शरीराला व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देतात, ज्यामुळे संसर्ग आणि थंडीपासून संरक्षण मिळतं.

टीप:

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही वैद्यकीय उपचाराचा हा पर्याय नाही. आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

Maharashtra News Live Update: अजित दादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT