Maha Shivratri fast  ai
लाईफस्टाईल

Maha Shivratri 2025 Vrat: महाशिवरात्रीला उपवास करणार आहात? नियमानुसार 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका

Maha Shivratri Fast: भारतात मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री साजरी केली जाते. हा दिवस सगळ्या शिवभक्तांसाठी खास असतो. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा भव्य दिवस साजरा केला जातो.

Saam Tv

भारतात मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री साजरी केली जाते. हा दिवस सगळ्या शिवभक्तांसाठी खास असतो. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा भव्य दिवस साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ ला साजरी केली जाणार आहे. या दिवशी लोक भगवान शंकराची पूजा करतात. त्याचसोबत व्रत सुद्धा करतात. त्याने आपल्या मनोकामना शंकर भगवान पुर्ण होतात. मात्र त्याची योग्य पद्धत काय? हे अनेकांना माहित नाही.

२६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीला व्रत करताना काही नियम समजून घेणे महत्वाचे आहे. त्यात तुम्ही निर्जळी उपवास करणार नसाल तर तुम्ही कोणत्या पदार्थाचे सेवन करावे किंवा करू नये? हे जाणून घेणार आहोत.

महाशिवरात्रीच्या उपवासात आपण कोणते पदार्थ खाऊ शकतो?

महाशिवरात्रीला तुम्ही उपवास करणार असाल तर काही फळांचा समावेश करावा. जसे की, सफरचंद, केळी, संत्री, डाळींब इ. फळांनी तुमच्या शरीरात ऊर्जा मिळते आणि पोट अधिक काळ भरलेले राहते.

बटाटा उपवासात खाऊ शकतो का?

हो, तुम्ही महाशिवरात्रीला उपवासात बटाट्यांचे सेवन करू शकता. तुम्ही हलका मसाला आणि मीठ बटाट्याला लावून दम आलू तयार करून खावू शकता.

दुधाचे कोणते पदार्थ उपवासात खाऊ शकतो?

तुम्ही महाशिवरात्रीला उपवास करताना दूध, दही, पनीर, छास या पदार्थांचे सेवन करू शकतो. सोबत तुम्ही धणे, बडीशेप, बदाम, काजू, मणुके, अखरोड, मखाणे या सगळ्या पदार्थांचे सेवन करू शकता.

महाशिवरात्रीला उपवास करताना कोणते पदार्थ खाऊ नये?

महाशिवरात्रीला व्रत करताना कधीही लसूण, कांदा या दोन पदार्थांचे सेवन करू नये. त्याचसोबत पांढरे मीठ सुद्धा सेवन करू नका. त्याऐवजी काळं मीठ तुम्ही सेवन करू शकता. तसेच उपवासाला तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, चणा डाळ, राजमा, मटर या पदार्थांचे सेवन करू नये. तसेच कोणताच मांसाहारी पदार्थ खाऊ नये.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT