Health Effects: घरात सकाळ - संध्याकाळ धूप लावल्याने शरीरावर गंभीर परिणाम होतो का? जाणून घ्या 'ही' 4 कारणे

Incense Burning: महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात त्यांच्या चालिरिती नुसार सकाळी उठून देवपूजा करण्याची प्रथा आहे. महत्वाचं म्हणजे कोणतीही पूजा धुप आणि अगरबत्ती शिवाय पुर्ण होत नाही.
Incense Burning
Health EffectsSaam TV
Published On

महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात त्यांच्या चालिरिती नुसार सकाळी उठून देव पूजा करण्याची प्रथा आहे. महत्वाचं म्हणजे कोणतीही पूजा धुप आणि अगरबत्ती शिवाय पुर्ण होत नाही. मात्र ही सवय आपल्या शरीरासाठी कितपत योग्य आहे. हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. यात पूजा करण्याबद्दल वाद नाही मात्र त्यावेळेस वापरल्या जाणाऱ्या धुप किंवा अगरबत्तीबद्दल आहे. कारण तुमच्या नकळत तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होण्याची सुद्धा शक्यता आहे. आज आपण आपल्या शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात हे पुढील माहिती द्वारे समजून घेऊ.

Incense Burning
Kidney Symptoms: किडनी निकामी झाल्यावर शरीरात काय बदल होतो? जाणून घ्या सविस्तर

धुप अगरबत्ती जाळल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

फुफ्फुसांवर होणारा परिणाम

काही व्यक्तींवर अगरबत्तीच्या धुरांमध्ये असणाऱ्या केमिकलने फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते अगरबत्ती आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉली अॅरोमऍटिक हायड्रोकार्बन्सचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. यातून निघणाऱ्या धुराच्या सतत संपर्कात राहिल्याने फुफ्फुसांच्या पेशींमध्ये जळजळ होऊ शकते.

Incense Burning
Mahashivratri 2025: बेलपत्र फक्त महादेवाला प्रिय नाही, तर आरोग्यासाठीही आहे वरदान; जाणून घ्या 'हे' ४ फायदे

त्वकेची अ‍ॅलर्जी

काही व्यक्तींना जास्त काळ अगरबत्तीच्या धुरामुळे डोळ्यात किंवा त्वचेशी संबधित अ‍ॅलर्जी होऊ शकते. या वस्तू जाळल्याने धुरामुळे डोळ्यांना जळजळ होऊ शकते. तसेच त्वतेवर खाज येऊ शकते.

मेंदूवर होणारा परिणाम

सुंगधित उदबत्तीमधून निघणाऱ्या धुरामुळे काहींच्या मानसिकतेवर परिणाम होतो. काहींना खूप फ्रेश वाटतं. तर काहींना ते आवडत नाही. याचा वापर दुर्घकाळ केल्याने डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव, डिमेंशिया आणि अल्झायमर सारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं.

श्वास घेताना होणारा त्रास

सीपीसीबी पॅनलच्या मते, हा धुर श्वसन क्षमतेवर परिणाम करतो. त्यांच्या संशोधनातून हे समोर आलं की, अगरबत्तीच्या जास्त काळ संपर्कात राहिल्याने तुम्हाला ३० टक्के श्वास घेताना त्रास होऊ शकतो. या धुरातून कार्बन मोनोऑक्साइड हवेत पसरतो. त्याने फुफ्फुसांच्या पेशींमध्ये जळजळ होऊ शकते.

टीप: ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Incense Burning
Kidney Symptoms: किडनी निकामी झाल्यावर शरीरात काय बदल होतो? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com