Money Plant Vastu saam tv
लाईफस्टाईल

Money Plant Vastu : तुमच्या घरी कोणत्या दिशेला आहे मनी प्लांट? चुकीच्या ठिकाणी असल्यास घरावर येतील संकटं!

Money Plant Vastu : वास्तूप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे काही खास नियम आहेत. यानुसार मनी प्लांटसाठी देखील एक नियम आहे. या नियमानुसार, मनी प्लांट ठेवण्याची योग्य दिशा कोणती हे जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक वास्तूचे काही नियम असतात. या वास्तूंच्या नियमानुसार, वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीचं एक ठराविक स्थान असतं. यावेळी घर असो, कामाचं ठिकाण असो किंवा मग अभ्यासाचं, वास्तूदोष दूर करण्यासाठी आपण महत्त्वाचे उपाय करत असतो. शास्त्रानुसार, मनी प्लांट घरात धन आणि समृद्धी आणतात असं मानलं जातं.

मीन प्लांट घरी असेल की निगेटीव्ह एनर्जी दूर होते, असा समज आहे. मनी प्लांटमुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरी संचार करते. यासाठीच वास्तू शास्त्रानुसार, मनी प्लांट कोणत्या ठिकाणी असावा हे माहिती असणं फार गरजेचं आहे.

मनी प्लांटसाठीचे नियम

मनी प्लांटमधून पैसे मिळवण्यासाठी काही नियमही नमूद करण्यात आलेत. जर तुम्ही चुकीच्या दिशेला मनी प्लांट लावलात तर हातात पैसा टिकत नाही, असं म्हटलं जातं. याउलट तुमच्या हातून पैसा निसटून जाऊ शकतो, असं म्हणतात. जर मनी प्लांट चुकीच्या दिशेला असेल तर लक्ष्मी घरात वास करत नाही, असंही म्हटलं जातं.

योग्य दिशेला असावं मनी प्लांट

योग्य दिशेला मनी प्लांट असल्याने घरात भरपूर पैसा येतो. अशावेळी घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही. वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या घरात मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला असणं लाभदायक असतं. यामुळे घरात सुख आणि समृद्धी वाढते. तर दुसरीकडे वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट कधीही ईशान्य दिसेला ठेवू नये. असं केल्याने लाभाऐवजी तुम्हाला तोटा होऊ शकतो.

त्याचप्रमाणे घराच्या पश्चिम आणि पूर्व दिशेला मनी प्लांट लावू नये. शिवाय मनी प्लांट कधीही जमिनीत लावू नये. असं केल्याने घरातील भांडणं वाढण्याचा धोका असतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: थकीत बिलासाठी कंत्राटदारचा आत्मदहनाचा प्रयत्न

Actress Accident: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात, बसनं दिली धडक

Kangana Ranaut: 'डेटिंग अ‍ॅप्स 'गटार' आहेत'; कंगना रनौतला नाही आवडत डेटिंग अ‍ॅप्स, कारण सांगत म्हणाली...

MLA Ashish Deshmukh : बाईकवर स्टंट करणं भाजप आमदाराला पडलं महागात, पोलिसांनी केली मोठी कारवाई; VIDEO व्हायरल होताच...

New cancer diagnosis method: आता केवळ आवाजाने समजणार तुम्हाला कॅन्सर झालाय ते; शास्त्रज्ञांनी शोधली नवी पद्धत

SCROLL FOR NEXT