Vastu Tips stairs saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : तुमच्या घरातील जिने कोणत्या दिशेला आहेत? पाहा वास्तू शास्त्राचा नियम काय सांगतो?

Vastu Tips : वास्तू नेहमी आपल्याला तथास्तु म्हणत असते. वास्तू शास्त्रानुसार, घरातील काही गोष्टींना खास नियम आखून देण्यात आले आहे. या नियमांनुसार, या गोष्टी केल्या पाहिजेत.

Surabhi Jagdish

प्रत्येकाचं घर हे त्याचं स्वप्न असतं. या घरामध्ये सर्व गोष्टी सुरळीत व्हाव्यात असं देखील आपल्याला वाटतं. आपल्या घरात म्हणजेच आपल्या वास्तूमध्ये कायम आनंदी वातावरण आणि सकारात्मक वातावरण राहवं यासाठी आपण प्रयत्न करतो. यावेळी आपण वास्तू शास्त्राची देखील मदत घेतो.

वास्तू शास्त्रामध्ये काही नियम दिले आहे. या नियमांचं जर आपण पालन केलं तर त्यामुळे घरामध्ये साकारात्मक ऊर्जा वाढते, असं म्हटलं जातं. याच वास्तू शास्त्रामध्ये घरातील शिड्या म्हणजेच जिन्यांबाबतही खास नियम देण्यात आले आहे. जर तुमच्या घरातील जिने चुकीच्या दिशेला असेल तर याचा परिणाम घरातील सकारात्मक उर्जेवर होतो.

वास्तूशास्त्रानुसार, जाणून घेऊया तुमच्या घरातील जिने कोणत्या दिशेला असले पाहिजेत. घरातील जिन्यांबाबत असणारे वास्तू नियम-

  • वास्तूमध्ये घराच्या नैऋत्य दिशेला पायऱ्या बांधणं खूप शुभ मानले जाते.

  • वास्तूनुसार पायऱ्यांची रुंदी योग्य आहे की नाही हे एकदा तपासून पाहा.

  • घरातील पायऱ्या नेहमी 11, 13, 15, 17 अशा विषम संख्येच्या असल्या पाहिजेत.

  • तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्या कधीही घरातील जिने नसावेत.

  • वास्तू शास्त्रानुसार, वक्र पद्धतीने जिना बांधणे अशुभ मानलं जातं.

  • वास्तूनुसार बांधलेले जिने तुटून नयेत याची काळजी घ्यावी. जर जिन्यांना तडा गेला असेल तर तातडीने दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा.

  • घरातील ब्रह्म स्थानही खूप महत्त्व आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ब्रह्म स्थान आहे, त्या ठिकाणी जिने नसावेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Jalgaon News : जळगाव शहरात कारमध्ये सापडली वीस लाख रुपयांची रोकड

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

Chhatrapati Sambhajinagar: रेडीको एनव्ही कंपनीमधील बॉयलरचा स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT