Towel Drying Tips saam tv
लाईफस्टाईल

Towel Drying Tips: बाथरूममध्ये टॉवेल नेमकं कुठे वाळत घातलं पाहिजे? तुम्हीही करता का 'ही' चूक; जाणून घ्या योग्य जागा

Dangers Of Hanging Towel On Shower Curtain Rod: अंघोळीनंतर ओला टॉवेल शॉवर रॉडवर टांगता का? बाथरूममधील ओलाव्यामुळे टॉवेलमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याचा धोका असतो. टॉवेल वाळवण्याची योग्य पद्धत, सूर्यप्रकाशाचे महत्त्व आणि तो किती वेळा धुवावा, जाणून घ्या या महत्त्वाच्या टिप्स.

Surabhi Jayashree Jagdish

अंघोळ झाल्यानंतर बहुतांश लोक ओलं टॉवेल बाथरूममध्येच शॉवर रॉडवर टांगतात. टॉवेल थोड्या वेळात वाळेल, असा त्यांचा समज असतो. पण टॉवेल वाळवण्याची ही योग्य पद्धत नाही. बाथरूममध्ये आधीच ओलावा जास्त असतो. शॉवरच्या आसपास तर ओलावा आणखी वाढतो. अशा ठिकाणी टांगलेला ओला टॉवेल व्यवस्थित वाळत नाही. त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया, बुरशी वाढण्याचा धोका असतो.

शॉवर रॉडवर टॉवेल टांगणं का टाळावं?

ओलं टॉवेल शॉवर रॉडवर टांगल्यामुळे तो पूर्णपणे उघडा राहत नाही आणि व्यवस्थित वाळतही नाही. टॉवेल मधून दुमडून रॉडवर टांगला, तर त्याचा मधला भाग बराच वेळ ओलसर राहतो. बाहेरचा भाग वाळलेला दिसत असला, तरी आतल्या बाजूला अनेक तास ओलावा राहू शकतो. हा ओलावा बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्यासाठी पोषक ठरतो. टॉवेल वारंवार अशाच पद्धतीने ओला राहिला आणि व्यवस्थित वाळला नाही, तर त्यातून हळूहळू दुर्गंधी येऊ लागते.

टॉवेलचा मधला भाग उशिरा वाळतो

टॉवेल शॉवर रॉडवर टांगल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजू लवकर वाळू शकतात. पण मधला भाग वाळण्यास जास्त वेळ लागतो. अनेकदा हा भाग कित्येक तास ओलसर राहतो. बाथरूममध्ये हवा खेळती नसेल किंवा सूर्यप्रकाश येत नसेल तर ही समस्या आणखी वाढते. ओलसर टॉवेलमधील बारीक जंतू त्याच्या कापडात चिकटून राहू शकतात. पुढच्या वेळी तोच टॉवेल वापरल्यास हे जंतू त्वचेच्या संपर्कात येऊ शकतात.

ओल्या टॉवेलमधून दुर्गंधी का येते?

अंघोळीनंतर वापरलेल्या टॉवेलमधून काही वेळाने कुबट वास येत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. याचे एक कारण म्हणजे टॉवेलमध्ये राहणारा ओलावा. टॉवेल वारंवार ओला होत असेल आणि पूर्णपणे वाळत नसेल तर त्यामध्ये बॅक्टेरियांची वाढ होऊ शकतं.

बाथरूममध्ये हवा खेळती नसेल, खिडकी नसेल किंवा सूर्यप्रकाश येत नसेल तर टॉवेल वाळण्यास जास्त वेळ लागतो. सतत ओलसर राहिल्यामुळे टॉवेलच्या कापडाची गुणवत्ता देखील हळूहळू खराब होऊ शकते. त्यामुळे स्वच्छ आणि मऊ वाटणारा टॉवेल काही दिवसांनी कुबट वास येणारा आणि अस्वच्छ वाटू लागतो.

टॉवेल वाळवण्यासाठी कोणती जागा योग्य?

टॉवेल वाळवण्यासाठी अशी जागा निवडा, जिथे तो पूर्णपणे पसरवून टांगता येईल आणि त्याच्या प्रत्येक भागाला हवा लागेल. यासाठी आडवा टॉवेल बार म्हणजेच टॉवेल टांगण्याची पट्टी हा चांगला पर्याय आहे. त्यावर टॉवेल पूर्ण पसरवून टांगल्यास तो समान पद्धतीने वाळण्यास मदत होते. बाथरूममध्ये हुक असेल तर त्यावरही टॉवेल टांगता येतो. पण तो खूप दुमडून किंवा गुंडाळून टांगू नका. टॉवेल जितका जास्त उघडा राहील तितका त्यातील ओलावा लवकर निघून जाईल.

सूर्यप्रकाशात टॉवेल वाळवणे सर्वात सोपा उपाय

शक्य असेल तेव्हा टॉवेल बाथरूममधून बाहेर काढून सूर्यप्रकाशात वाळवणं चांगलं. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे म्हणजेच UV किरणांमुळे कापडावरील काही सूक्ष्म जंतू कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश यामुळे टॉवेल लवकर वाळतो आणि त्यातील कुबट वासही कमी होऊ शकतो.

टॉवेल बाहेर सूर्यप्रकाशात वाळवण्याची सोय नसेल, तर बाथरूममध्ये एग्झॉस्ट फॅन सुरू ठेवा. अंघोळ झाल्यानंतर किमान ३० मिनिटे एग्झॉस्ट फॅन चालू ठेवल्याने बाथरूममधील अतिरिक्त ओलावा कमी होण्यास मदत होऊ शकते.

टॉवेल किती वेळा धुवावा?

टॉवेल योग्य पद्धतीने वाळवण्यासोबतच तो नियमित धुणंही गरजेचं आहे. साधारणपणे टॉवेल ३ ते ४ वेळा वापरल्यानंतर धुवावा. हवेत ओलावा जास्त असेल किंवा बाथरूममध्ये टॉवेल लवकर वाळत नसेल तर त्यापेक्षा कमी वापरानंतरही धुणे चांगलं. वारंवार ओला होणारा टॉवेल बराच काळ न धुता वापरल्यास त्यामध्ये ओलावा आणि बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहाद्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; १२ वर्षीय बालकावर हल्ला

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये सलमान खानचा चढला पारा! स्काउट आणि गुल्लूला सुनावले खडेबोल, लव्ह गिलला अश्रू अनावर

महिलांसाठी कश्मिरी कानातल्यांचे लेटेस्ट पॅटर्न, 5 डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील

Kitchen Tips : भाज्या आधी धुवाव्यात की कापल्यानंतर? संशोधनातून समोर आली योग्य पद्धत

Delimitation Bill: यांचा विरोध डिलिमिटेशनला नाही तर महिला आरक्षणाला, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT