Manasvi Choudhary
तुम्हालाही नेहमीच्या झुमक्या आणि कानातल्यांपेक्षा काहीतरी वेगळे व आकर्षक हवे असेल तर सध्या कश्मिरी स्टाईलचे कानातले तुम्ही निवडू शकता. हे कानातले सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
लांब साखळ्या, नाजूक घुंगरू आणि सुंदर पेडंट्स असलेले हे कानातले साडी, लेहेंगा, अनारकली ड्रेस कशावरही सुंदर दिसतात.
तुम्हालाही लेटेस्ट कश्मिरी कानातल्यांचे लेटेस्ट डिझाईन्स हवे असतील तर 5 पॅटर्न्स पाहूया.
जर तुम्हाला अस्सल पारंपारिक लूक हवा असेल, तर तुम्ही साखळ्यांना जोडलेले कश्मिरी कानातले निवडू शकता. हे कानातले कानाच्या वरच्या बाजूने किंवा कानाच्या मागे केसांमध्ये पिनने अडकवले जातात.
जर तुम्हाला खूप मोठे किंवा जड दागिने आवडत नसतील, तर तुम्ही कश्मिरी मोत्याचे छोटे आणि सुंदर कानातले निवडू शकता.
लाल, हिरव्या, निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या खड्यांनी सजवलेले कश्मिरी कानातले कोणत्याही रंगाच्या आउटफिटवर सहज मॅच होतात. या कानातल्यांच्या पेडंटच्या मध्यभागी असलेला मोठा खडा आणि बाजूचे बारीक कोरीव काम यामुळे अधिक सुंदर दिसतात.
फुलांच्या नक्षीचे कानातले नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. कश्मिरी डिझाईन्समधील फुलांच्या नक्षीमध्ये छोटे मोती, चमकदार खडे किंवा नाजूक घुंगरू जोडलेले असतात.
जर तुम्हाला गोल्डनऐवजी सिल्वर पॅटर्नमध्ये दागिने हवे असतील, तर लेटेस्ट ट्रेंडिंग ऑक्सिडाइज्ड चांदीच्या दागिन्यांची निवड करा. ऑक्सिडाइज्ड कश्मिरी झुमके किंवा साखळी असलेले कानातले कॉटन साडी, अनारकली ड्रेस तसेच जीन्स-कुर्ती या स्टाईलवर सूट होतात.