Marriage Line in Palmistry saam tv
लाईफस्टाईल

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

Marriage line on palm: हस्तरेषा शास्त्रानुसार हातावरील विवाह रेषेवरून लग्नाचं वय आणि वैवाहिक जीवनाबाबत काही अंदाज व्यक्त केले जातात. विवाह रेषा कुठे असते, तिची ठेवण काय दर्शवते आणि शुक्र पर्वत व हृदय रेषेचं महत्त्व काय, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकदा असं म्हटलं जातं की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. मात्र हस्तरेषा शास्त्रानुसार हातावरील रेषांचाही प्रेम आणि वैवाहिक जीवनाशी संबंध जोडला जातो. हातावरील विवाह रेषा पाहून लग्न कधी होईल, वैवाहिक जीवन कसं असेल, याबाबत काही अंदाज व्यक्त केले जातात.

विवाह रेषा पाहण्यापूर्वी शुक्र पर्वत आणि हृदय रेषाही पाहिली जाते. हस्तरेषा शास्त्रातील मान्यतेनुसार, हृदय रेषा स्पष्ट असेल तर ते चांगल्या नात्याचं लक्षण मानलं जातं. तर शुक्र पर्वत उठावदार असल्यास त्याचा संबंध प्रेम आणि आकर्षणाशी जोडला जातो. चला तर मग, हातावरील विवाह रेषेबाबत काय मान्यता आहेत, ते जाणून घेऊया.

हातावर विवाह रेषा कुठे असते?

हस्तरेषा शास्त्रानुसार, हाताच्या करंगळीखाली आणि हृदय रेषेच्या वरच्या बाजूला विवाह रेषा असते. ही रेषा हाताच्या बाहेरील कडेवर दिसते. या ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा जास्त छोट्या रेषा असू शकतात. या रेषांचा संबंध प्रेमसंबंध आणि लग्नाशी जोडला जातो.

हातावरील रेषेवरून लग्नाचं वय कसं ओळखतात?

हस्तरेषा शास्त्रातील मान्यतेनुसार, हृदय रेषा आणि करंगळी यांच्यामधील जागा पाहून लग्नाच्या वयाचा अंदाज लावला जातो.

  • रेषा मधोमध असल्यास : साधारण २५ व्या वर्षी लग्न होण्याचा संकेत मानला जातो.

  • रेषा हृदय रेषेच्या जवळ असल्यास : कमी वयात लग्न होण्याची शक्यता असल्याचं मानलं जातं.

  • रेषा करंगळीच्या जवळ असल्यास : उशिरा लग्न होण्याचा संकेत मानला जातो.

सुखी वैवाहिक जीवनाबाबत काय सांगते विवाह रेषा?

हस्तरेषा शास्त्रात विवाह रेषेची लांबी आणि तिची ठेवण यावरून वैवाहिक जीवनाबाबत काही मान्यता सांगितल्या जातात. हातावरील रेषांवरून नात्यातील परिस्थितीचे संकेत मिळू शकतात, असं मानलं जातं.

स्पष्ट आणि लांब विवाह रेषा

हातावरील विवाह रेषा स्पष्ट आणि लांब असेल, तर ती सुखी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वैवाहिक जीवनाचं लक्षण मानली जाते.

विवाह रेषेवर गोल चिन्ह

विवाह रेषेवर छोटं गोल चिन्ह दिसत असेल, तर त्याचा संबंध वैवाहिक नात्यात येणाऱ्या अडचणींशी जोडला जातो.

रेषेच्या सुरुवातीला काट्यासारखं चिन्ह

विवाह रेषेच्या सुरुवातीला काट्यासारखं चिन्ह असेल, तर लग्नाच्या सुरुवातीच्या काळात उशीर किंवा निराशा येण्याचा संकेत मानला जातो.

रेषेच्या शेवटी काट्यासारखं चिन्ह

विवाह रेषेच्या शेवटी काट्यासारखं चिन्ह दिसल्यास, पती-पत्नीमध्ये अंतर वाढणं किंवा वेगळं होण्याची शक्यता असल्याची मान्यता आहे.

शुक्र वलयाला छेद देणारी रेषा

हातावरील शुक्र वलयाला एखादी रेषा छेद देत असेल तर त्याचा संबंध वैवाहिक नात्यातील तणाव आणि पती-पत्नीमधील मतभेदांशी जोडला जातो.

डिस्क्लेमर

हस्तरेषा शास्त्रातील मान्यतांनुसार या बातमीत माहिती देण्यात आली आहे. हातावरील विवाह रेषेवरून लग्नाचे वय, जीवनसाथी किंवा वैवाहिक जीवन याबाबत केले जाणारे दावे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. ही माहिती केवळ सामान्य माहिती व मनोरंजनाच्या उद्देशाने देण्यात आली आहे. यावर अंधविश्वास ठेवू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT