Republic Day 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

Republic Day 2024 : पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा करण्यात आला? जाणून घ्या

Republic Day 2024 Celebration : २६ जानेवारी १९५० साली भारतीय प्रजासत्ताक दिनाची स्थापना झाली. त्या दिवसापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला. यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

कोमल दामुद्रे

When Was First Republic Day :

२६ जानेवारी १९५० साली भारतीय प्रजासत्ताक दिनाची स्थापना झाली. त्या दिवसापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला. यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

यादिवशी कर्तव्यदतक्ष भारतीय सैन्याच्या शौर्याने, विविध राज्यांचे तक्ते आणि वंदे मातरमच्या घोषात लोकांमध्ये असलेली अफाट देशभक्ती. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते तिरंगा फडकवला जातो. त्यानंतर विविध राज्यांची झलक दाखवली जाते. परंतु, पहिला प्रजासत्ताक दिन (Republic Day) कधी साजरा (Celebrate) केला जाणून घेऊया त्याबद्दल.

1. पहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला गेला?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु, २६ जानेवारी, १९५० पर्यंत प्रजासत्ताक बनला नव्हता. देशाला ब्रिटीश कायद्यापासून मुक्त करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभा स्थापना करण्यात आली.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला. समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या (India) संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

2. पहिला प्रजासत्ताक दिन कुठे साजरा झाला?

पहिली परेड आयर्विन अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. ज्याला मेजर ध्यानचंद स्टेडियम म्हणून ओळखले जाते. या परडेमध्ये ३ हजार लोक आणि १०० विमाने सहभागी झाले होते. त्यानंतर रामलीला मैदान, इर्विन स्टेडियम आणि लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे आयोजन करण्यात आले. यानंतर दरवर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT