Bharat Jadhav
हिंदू धर्म, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातील पारंपारिक समजुतींनुसार वेगवेगळ्या स्थितीचं वेगवेगळे कारण असते, त्या संकेतांचा वेगळा अर्थ असतो.
जर तुमची तुळशीची पाने काळी पडली किंवा सतत निस्तेज दिसतेय तर ते बहुतेकदा वाईट नजरेच्या प्रभावामुळे होतेय. घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव झाला असेल तर तुळशी वाळत असते.
अनेकजण याला धोक्याचा इशारा समजतात. घरातील प्रमुखावर संकट येणार असल्याचं मानलं जातं.
नेहमी तुळशीच्या रोपाला पाणी दिलं आणि सूर्यप्रकाश मिळाला, किंवा योग्य काळजी घेतली तरीही रोप कोमजत असेल तर घरात नकारात्मकता किंवा निराकरण न झालेल्या भावनिक ताण असतो.
तुळशीच्या कुंडीभोवती मुंग्या जमा झाल्यास हे येणाऱ्या आर्थिक अडचणी, अनपेक्षित खर्च किंवा चोरीचे लक्षण मानले जाते. किंवा घरात कोणी अशी व्यक्ती आली असेल तर जे तुमच्याविषयी वाईट भावना ठेवून असते.
जेव्हा तुळशीला नवीन पाने येणे थांबते, तेव्हा पारंपारिक श्रद्धा अशी आहे की करिअरमध्ये अडथळे, व्यवसायात काहीतरी त्रास किंवा मुलांशी संबंधित ताण दर्शवत असते. समृद्धीत स्थिरता असल्याचं देखील ते प्रतीक आहे.
तुळशीच्या पानांचे रंग फिकट होत असतील किंवा पिवळी होत असतील हे कुटुंबातील सदस्यांमधील वाद, वैचारिक मतभेद निर्माण होणार असल्याचं म्हटलं जातं.
वास्तुशास्त्रात तुळशी उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी. जर तुळशी योग्य दिशेला ठेवली तरी रोप खराब होऊ लागली तर वाद, मानसिक ताण आणि वारंवार अडचणी वाढतील असं मानलं जातं.
परंपरेनुसार पूर्णपणे वाळलेली तुळशी जास्त काळ घरात राहू देऊ नका. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत असते.