Asambhav: भूतकाळ, पुनर्जन्म आणि खून...; 'असंभव'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Asambhav Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य, भावना आणि थराराचा नवा अध्याय लिहिणारा ‘असंभव’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सचित पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Asambhav
AsambhavSaam Tv
Published On

Asambhav Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य, भावना आणि थराराचा नवा अध्याय लिहिणारा ‘असंभव’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सचित पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रभावी आणि रहस्यमय ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वी झळकलेल्या टीझरनेच रहस्याचा पाया रचला होता, आणि आता ट्रेलरने त्यात अधिक थरारक रंग भरले आहेत.

असंभव’ची कथा नैनितालच्या निसर्गरम्य वातावरणात घडते शुभ्र धुक्याने झाकलेले पर्वत, शांत दऱ्या आणि एका गूढ हवेलीच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कहाणी प्रेक्षकांना एका अनोख्या जगात घेऊन जाते. हवेलीतील अघटित घटना, शांततेच्या आड दडलेली भीती आणि प्रत्येक पात्राच्या अंतर्मनातील रहस्य या सर्वांचा संगम ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दिसतो. दृश्यरचना आणि पार्श्वसंगीत यामुळे कथानकाला अधिक गूढ आणि थरारक स्वरूप प्राप्त झालं आहे.

Asambhav
Actor Fake Death News: धर्मेंद्र यांच्यानंतर जॅकी चॅनच्या मृत्यूच्या अफवा, नेमकं सत्य काय?

या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रिया बापट, सचित पाटील आणि संदीप कुलकर्णी हे चार दमदार कलाकार एकत्र दिसणार आहेत. मुक्ता बर्वेच्या डोळ्यांतील भीती आणि शोध, प्रिया बापटचं गूढ व्यक्तिमत्त्व, सचित पाटीलचा उत्तरांच्या शोधात असलेला प्रवास आणि संदीप कुलकर्णी यांच्या भूमिकेतील रहस्य या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा अनुभव निर्माण केला आहे.

Asambhav
Salman Khan: सलमान खानच्या फार्महाऊस पार्टीत नेमकं काय होते? शहनाज गिलने उघड केलं गुपित

दिग्दर्शक सचित पाटील म्हणतात, “‘असंभव’ ही केवळ रहस्यकथा नाही, तर पुनर्जन्म, भावना आणि नात्यांच्या बंधांचा संगम आहे. मराठी सिनेमात पुनर्जन्मासारख्या संकल्पनेवर फार कमी काम झालं आहे, त्यामुळे प्रेक्षकांना हा अनुभव वेगळा आणि भावनिक वाटेल.”

चित्रपटाचं दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून, पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. निर्मिती मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांची असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तसेच पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि पुनर्जन्माच्या संगमातून उलगडणारा हा थरारक सिनेमा २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘असंभव’चा ट्रेलर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com