Narak Chaturdashi saam tv
लाईफस्टाईल

Narak Chaturdashi 2024: यंदाच्या वर्षी नरक चतुर्दशी केव्हा आहे? या दिवशी करा 'हे' काम, पाहा मुहूर्त!

Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीच्या दिवशी कृष्ण आणि यमराज यांची पुजा करण्यात येते. मात्र यंदाच्या वर्षी नरक चतुर्दशी केव्हा आहे, ते पाहूयात.

Surabhi Jagdish

दिवाळी आली असून सर्वांच्या घरी या सणाची लगबग सुरु असेल. दिवाळीच्या दिवसातील अजून एक महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुदर्शी. या दिवशी कृष्ण आणि यमराज यांची पुजा करण्यात येते. मात्र यंदाच्या वर्षी नरक चतुर्दशी केव्हा आहे, ते पाहूयात.

नरक चतुर्दशीला यमाच्या नावाने दिवे लावणाऱ्यांना यमलोक पाहण्याची गरज नसते, असं मानलं जातं. नरक चतुर्दर्शीच्या दिवशी असं केल्याने अकाली मृत्यूने येत नाही असा समज आहे. मान्यतेनुसार, जे लोक या दिवशी अभ्यंग स्नान करतात ते नरकात जाणं टाळू शकतात. 2024 मध्ये नरक चतुर्दशी कधी आहे त्याचप्रमाणे तिथी, शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

नरक चतुर्दशी 2024 चा शुभ मुहूर्त (Narak Chaturdashi 2024 date and time)

दिवाळीच्या दिवसाप्रमाणे यावेळी नरक चतुर्दशीच्या तारखेबाबतही लोकांच्या मनात संभ्रम आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १.१५ वाजता सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३.५२ वाजता संपणार आहे.

नरक चतुर्दशीला प्रदोष काळात यमासाठी दिवे लावण्यात येतात. अशा परिस्थितीत यंदा नरक चतुर्दशी ३० ऑक्टोबर २०२४ रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे चतुर्दशी तिथी सूर्योदयापासून सुरू होत असताना अभ्यंग स्नान सकाळी केलं जातं.

  • नरक चतुर्दशी यम दीपक - 05.30 pm ते 07.02 pm (30 ऑक्टोबर)

  • अभ्यंगस्नान - सकाळी 05.20 ते 06.32 (31 ऑक्टोबर)

नरक चतुर्दशीला काय केलं पाहिजे?

या दिवशी मृत्यूची देवता यमराज आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही या दिवशी यांची पूजा करू शकता. सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं, त्यानंतर श्रीकृष्णाची पूजा करावी. त्याचप्रमाणे नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी यमराजाच्या नावाने दिवा लावावा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : दौंड तालुक्यात दोन एसटी बसचा अपघात; 40 हुन अधिक प्रवासी जखमी

Maharashtra Election: लोकसभेत तह विधानसभेत चेकमेट; पुरंदरमध्ये राष्ट्रवादीनेच वाढवलं महायुतीच्या विजय शिवतारेंचं टेन्शन

Maharashtra Election : मोठी बातमी! विधानसभेसाठी भाजपने मित्रपक्षांना सोडल्या ४ जागा, कुणाला केला पाठिंबा जाहीर?

40000 सूट, 165km रेंज; Hero च्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे जबरदस्त दिवाळी ऑफर

Maharashtra Election : 2 जागा, एक कॅबिनेट मंत्रिपद, ४ महामंडळ अध्यक्षपद; महायुतीकडून रामदास आठवलेंची नाराजी दूर?

SCROLL FOR NEXT