मुंबई : उन्हाळा म्हटलं की, अंगाची लाहीलाही व घामाने आपण भिजतो. त्यात आता नुकतीच सुरू झालेल्या लग्नसराई (Wedding) व पार्टीला जाताना आपल्याकडे अनेकदा मॅचिंग साडीवर दागिने नसतात किंवा दागिने असतात तर, मॅचिंग साडी (saree) नसते. दागिने घालायची आपल्याला खूप हौस असते पण सध्याच्या ट्रेंडनुसार 'द मंचिग' ला प्राधान्य दिले जात आहे; पण असे करू नका.
हे देखील पहा -
दागिने निवडताना कोणते निकष लावायचे हे जाणून घेण्यासाठी वाचा हे खास कानमंत्र...
अशी करा साड्यांवर दागिन्यांची निवड
१. चुकूनही साडीवर मंचिंग दागिने घालण्याची चूक करु नका कारण एकच रंग संपूर्ण अंगावर छान दिसत नाही.
२. साडीवर दागिन्यांची निवड करताना पदराचा किंवा साडीच्या काठाचा रंग लक्षात घ्या आणि त्यानुसार तुमच्या दागिन्याचा रंग निवडा.
३. सध्या उन्हाळा चालू असल्याने साध्या लुककडे तुमचा कल हवा. शक्यतो नाजूक आणि कमीत कमी दागिने घाला. साडीच्या रंगाच्या विरुध्द रंगाचे दागिने तुम्ही निवडू शकता. म्हणजे पिवळी साड़ी असेल तर त्यावर केशरी, हिरवे दागिने निवडू शकता.
४. साडीचं फॅब्रिक किंवा टेक्श्चर कसं आहे, हेसुद्धा दागिन्यांची निवड करताना लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जॉर्जिट किंवा शिफॉनची साडी असेल, तर त्यावर सोन्याचे (Gold) भरजरी हार छान दिसत नाहीत. तिथे तुम्ही वेस्टर्न असलेली नाजूक ज्वेलरी घालणे उत्तम.
५. आपल्याकडे असणारे सगळेच दागिने एकाच वेळी घालायला हवेत असे नाही. त्यामुळे एखाद्या साडीवर फक्त चोकर छान दिसत असेल तर कानात काही घालायला हवं असे नाही किंवा कानातले खूप जड असतील तर गळ्यातल घालू नका.
६. साडी भारी असेल, तर दागिने कमी घाला किंवा साडी साधी असेल तर त्यावर साजेसे दागिने घालून तिचा लूक सुंदर करा.
७. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारंपरिक साड्यांवर दागिन्यांच्या बाबतीत कोणतेही प्रयोग न करता पारंपरिक दागिनेच घाला. त्यामुळे एक संपूर्ण छान लूक मिळण्यास मदत होते. तसेच दागिने निवडल्यानंतर त्यावर साजेसा मेकअप करा. अगदी गडद मेकअपही करु नका त्यामुळे तुमचा लूक खराब होऊ शकतो.
अशाप्रकारे तुम्ही दागिन्यांची निवड करु शकता व छान दिसू शकता.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.