Prediction Of Death saam tv
लाईफस्टाईल

Prediction Of Death: कधी आणि कसा होणार मृत्यू? डॉक्टरांनी तयार केलं मृत्यूचं अचूक भाकीत करणार टूल

Surabhi Jagdish

आपल्या जगात अनेक रहस्य आहेत. तर काही रहस्य अशी आहेत, ज्यांच्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. या जगात जो व्यक्ती जन्म घेतो त्याचा मृत्यू हा होतोच. जन्माला आलेल्या व्यक्तीचा मृत्यू हा अटळ आहे. मात्र मृत्यू तुम्हाला कधी आणि कुठे गाठेल याची खात्री दिली जाऊ शकत नाही. मात्र तुम्हाला तुमचा मृत्यू कधी आणि कुठे होणार हे समजलं तर?

तुम्ही म्हणाला ही फसवं वाटेल मात्र, असं आम्ही नाही तर अमेरिकेचे शास्त्रज्ञ तुम्हाला सांगणार आहेत. जन्माला आलेल्या व्यक्तीचा मृत्यू हे अटळ सत्य आहे. मृत्यू कसा होईल हे कोणाला सांगता येत नाही. परंतु आता अमेरिकेच्या डॉक्टरांनी याचा शोध लागल्याचा दावा केलाय. याचा अर्थ शास्त्रज्ञ अशा टप्प्यावर पोहोचलेत की, ते मृत्यूचं अचूक भाकीत करण्याचा दावा करतायत.

वयाचा प्रभाव प्रत्येकावर वेगवेगळा दिसतो यात शंका नाही. चांगल्या जीनमुळे काही लोकांचं वय हळूहळू वाढतं. दिसते, तर काही लोक चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींमुळे कमी वयातच अधिक वय दिसू लागतं. कमी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धुम्रपान, मद्यपान आणि टेन्शन या गोष्टी डीएनएवर खुणा सोडतात. अशा परिस्थितीत, शास्त्रज्ञांनी हे बदल मोजण्याचा मार्ग शोधलाय. ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचे वय किती वेगाने वाढतंय याचा अंदाज लावण्यात येतो.

मृत्यूची वेळ सांगणार हे टूल

गेल्या दहा वर्षांमध्ये संशोधकांनी एपिजेनेटिक क्लॉक नावाचं एक टूल विकसित केलंय. जे जीवनशैलीच्या सवयींमुळे डीएनएमधील बदलांना ट्रॅक करतं. यासाठी रक्त पेशींची मदत घेण्यात येत असून ही एक कठीण प्रक्रिया आहे. त्यामुळे आता अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या टीमने या क्लॉकची नवी आवृत्ती चीकएज तयार केलीये. जे गालांच्या आतील पेशींचा वापर करून डीएनएमधील बदलांची माहिती देतं.

मृत्यचं अचूक भाकित होणं शक्य?

फ्रंटियर्स इन एजिंगमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, चीकएज मृत्यूच्या धोक्याचा अचूक अंदाज लावू शकतं. संशोधनाचं प्रमुख डॉ. मॅक्सिम शोकिरेव्ह यांच्या सांगण्यानुसार, आम्हाला विशिष्ट मार्कर सापडलेत जे कोणी किती काळ जगू शकतात. त्यामुळे या टूलचा याच्याशी जवळून संबंध असल्याचं समोर आलं आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT