Whatsapp - जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुम्ही ही बातमी नक्की वाचा. कारण तुमच्या फोनवरील व्हॉट्सअपची Whatsapp सेवा कधीही बंद होऊ शकते. व्हॉट्सअॅप कंपनीने अलिकडेच एक नवीन पॉलिसी Policy जाहीर केली आहे. त्यामुळे याचा फटका अनेक लोकांना बसण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन वापरणारी अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जी व्हॉट्सअॅप वापरत नसेल. मात्र व्हॉट्सअॅप कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. काही जुन्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या दोन महिन्यात जवळपास 40 हून अधिक स्मार्टफोनवरील व्हॉट्सअॅपची सेवा बंद केली जाणार आहे. व्हॉट्सअॅपने यावर्षी अनेक नवीन फीचर्स व्हॉट्सअॅपमध्ये जोडले आहेत. व्हॉट्सअॅप सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
१ नोव्हेंबरपासून अँड्रॉइड Android आणि आयओएस IOS दोन्ही प्लॅटफॉर्मच्या काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. रिपोर्टनुसार, अँड्रॉइड 4.0.4 वर चालणाऱ्या स्मार्टफोनवर चालणार नाही. एवढेच नाही तर व्हॉट्सअॅप कंपनी iOS 9 वर चालवणाऱ्या iPhones वर देखील आपला सपोर्ट बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सॅमसंग 'या' स्मार्टफोनमध्ये करणार नाही व्हॉट्सअॅप
१ नोव्हेंबरपासून Samsung Galaxy SII, , Samsung Galaxy Ace 2, Samsung Galaxy S3 mini, Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy Trend II, Samsung Galaxy Xcover 2 आणि Samsung Galaxy Core.
सोनीच्या 'या' स्मार्टफोनमध्ये करणार नाही व्हॉट्सअॅप
Ascend D2. ZTE Grand S Flex, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, ZTE V956, Grand X Quad V987, Sony Xperia Miro, Sony Xperia Neo L, Xperia Arc S, Huawei Ascend G740, Ascend Mate, Ascend P1 S आणि Grand Memo.
एलजी 'या' स्मार्टफोनमध्ये करणार नाही व्हॉट्सअॅप
Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6, Enact , LG Lucid 2, Optimus F7, Optimus F5, Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L3 II, Optimus L7, Optimus L4 II आणि Optimus L2 II
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.