WhatsApp QR Code Feature  Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Update: काय सांगता! QR कोड वापरुन करता येणार व्हॉट्सअॅपवर नंबर सेव्ह, फक्त या ३ स्टेप्स फॉलो करा

WhatsApp New Feature : व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरमध्ये तुम्ही तुमच्या मित्रांचे, नातेवाईकांचे नंबर एका क्यू आर कोडद्वारे सेव्ह करु शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

WhatsApp QR Code Feature

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. जग आता डिजिटल माध्यमातून जास्त जोडले जात आहे. प्रत्येक जण इंटरनेटच्या साहय्याने जोडले जात आहे. यातच लोकांना एकमेकांशी जोडण्याचा मोठा दुवा म्हणजेच व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅप आता एक नवीन फिचर युजर्ससाठी घेऊन आले आहे.

जगात सर्वात जास्त लोक व्हॉट्सअॅपद्वारे जोडले गेले आहे. तब्बल ५५० दक्षलक्षहून जास्त लोक व्हॉट्सअॅप वापरतात. जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती व्हॉट्सअॅपवरुन कनेक्ट होऊ शकतो. आता व्हॉट्सअॅपने एक नवीन फिचर आणले आहे. ज्यात तुम्ही तुमच्या मित्रांचे, नातेवाईकांचे नंबर एका क्यू आर कोडद्वारे सेव्ह करु शकता.

पूर्वीच्या काळात जर कोणाचा नंबर हवा असेल तर तो शेअर करावा लागायचा आणि नंतर सेव्ह करावा लागायचा. परंतु व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचर्सच्या आधारे तुम्ही नंबरशिवाय लोकांना तुमच्या व्हॉट्सअॅपवर अॅड करु शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार आहे. यामुळे वेळ वाचणार आहे.

प्रोसेस कशी असेल?

  • तुमचे व्हॉट्सअॅप ओपन करा.

  • व्हॉट्सअॅपच्या उजव्या बाजूला ३ पॉइंट्स असतात. त्यावर क्लिक करा.

  • आता सेटिंग्सवर क्लिक करा.

  • तुम्हाला एक नवीन पेज दिसेल. त्याच्या उजव्या बाजूला QR कोडवर क्लिक करा.

  • नंतर Scan QR Code चा पर्याय दिसेल. तो QR तुमच्या फोनने स्कॅन करा.

  • स्कॅन करताच तुम्हाला एक नवीन नंबर दिसेल. त्यानंतर तुम्ही नंबर सेव्ह करु शकता.

एचडी व्हिडिओ शेअर करता येणार

व्हॉट्सअपने २०२३ मध्ये अनेक नवीन फिचर्स उपलब्ध केले आहेत. अलीकडेच व्हॉट्सअॅपने एचडी व्हिडिओ शेअर करण्याचे फिचर सादर केले आहेत. व्हॉट्सअॅपने एचडी इमेजेस पाठवण्यासाठी सपोर्ट सुरू केल्यानंतर काही दिवसांनी एचडी व्हिडिओही शेअर करु शकता. या नवीन फिचरमुळे तुम्ही व्हिडिओ एचडी स्वरुपात पाठवू शकणार आहात.

व्हॉट्सअॅप स्टेट्सला अवतारासह उत्तर देऊ शकता

व्हॉट्सअॅपवर नवनवीन अवतार उपलब्ध झाले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नवीन अवतार बनवू शकता. सध्या व्हॉट्सअॅप 8 इमोजी वापरुन स्टेट्सला रिप्लाय करण्याची सुविधा देतं. तर आता व्हॉट्सअॅपने अवतारासह उत्तर देण्याचे नवीन फिचर लॉन्च करण्याची तयारी केली आहे. यामुळे लोकांना व्हॉट्सअॅप स्टेट्सला उत्तर देणे अजूनच सोपे होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT