WhatsApp Instant Video Messages Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Instant Video Messages : टाईप करायची कटकट संपली! व्हॉट्सअॅपवर आलं इन्स्टंट व्हिडीओ मेसेज फीचर; जाणून घ्या कसं वापरायचं...

Whatsapp New Features: टाईप करायची कटकट संपली! व्हॉट्सअॅपवर आलं इन्स्टंट व्हिडीओ मेसेज फीचर; जाणून घ्या कसं वापरायचं...

Satish Kengar

WhatsApp Instant Video Messages : व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी एक जबरदस्त फीचर घेऊन आल आहे. आतापर्यंत तुम्ही अॅपवर फक्त लिहून किंवा बोलून मेसेज पाठवू शकत होता, पण आता तुम्ही व्हिडीओ मेसेजही पाठवू शकणार आहात.

मेटाने आज एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे. जे लवकरच WhatsApp वर उपलब्ध होईल. मेटा कंपनीचा मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) याने त्यांच्या अधिकृत फेसबुक हँडलवरून एका पोस्टमध्ये सांगितले की, व्हॉट्सअॅपला एक नवीन इन्स्टंट व्हिडीओ मेसेज (Instant Video Message) फीचर जोडले जाणार आहे. हे फीचर युजर्सला व्हिडीओ मेसेज वैयक्तिक चॅट आणि ग्रुपमध्ये शेअर करण्याची परवानगी देईल.

मार्क झुकरबर्ग आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "...आम्ही तुमच्या WhatsApp चॅट्समध्ये व्हिडीओ मेसेज इन्स्टंट रेकॉर्ड आणि शेअर करण्याची क्षमता जोडत आहोत. हे क्लिक व्हॉइस मेसेज पाठवण्याइतके सोपे आहे.'' (Latest Marathi News)

कसं काम करतं हे इन्स्टंट व्हिडीओ मेसेज फीचर?

कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, नवीन इन्स्टंट व्हिडीओ मेसेज फीचर व्हॉइस मेसेज फीचरसारखेच आहे, जे व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवर आधीपासूनच उपलब्ध आहे. आत्तापर्यंत व्हॉट्सअॅप युजर्स टेक्स व्हॉइस मेसेजच्या स्वरूपात इन्स्टंट पाठवू शकत होते. लवकरच, युजर्स व्हिडीओ स्वरूपात देखील तेच करू शकतील.

हे फीचर वापरणे खूप सोपे आहे. एकदा तुम्ही तुमच्या Android फोन किंवा iPhone वर WhatsApp चे अपडेटेड व्हर्जन डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला फक्त व्हिडीओ मोडवर स्विच करण्यासाठी टॅप करा आणि व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी बटन होल्ड करावे लागेल. याव्यतिरिक्त, तुम्ही व्हिडीओ लॉक करण्यासाठी आणि हँड्स-फ्री रेकॉर्ड करण्यासाठी स्वाइप देखील करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT